विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न – नितेश खाणेकर
मुळशी I झुंज न्यूज : विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे ह्या हेतूने घनगड प्रतिष्ठान आयोजित शालेय कर्तृत्व स्पर्धा चे आयोजन विंझाई देवी हायस्कूल ताम्हीणी तसेच न्यू इंग्लिश स्कूल घोटावडे व मामासाहेब मोहोळ विद्यालय शेरे येथे वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विझाई देवी हायस्कूल चे विद्यार्थ्यांनी बहु संख्येने सहभाग घेतला होता. या मध्ये लहान गट इयत्ता ५ ते ७ तर मोठा गट ८ ते९ करण्यात आला होता. लहान गटातुन प्रथम क्रमांक श्रमिका गोरे, दुसरा क्रमांक प्राची ढमाले, तिसरा क्रमांक अनुजा पळसकर, तर मोठा गटातुन प्रथम क्रमांक शंताशू धिंडले, दुसरा क्रमांक प्रथमेश मोरे, तिसरा क्रमांक प्राची बामगुडे या विद्यार्थ्यांना ट्रोपी पारितोषिक देण्यात आली. विंझाईदेवी हायस्कूल चे मुख्याध्यापक गुफर शेख सर व उपशिक्षक बाळासाहेब गोरे सर, अशोक केदार सर, नामदेव वाघ सर, रामलाल शिंदे सर तसेच न्यू इंग्लिश स्कूल घोटावडे ,मुला मुलीचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या मध्ये लहान गट इयत्ता ५ ते ७ तर मोठा गट ८ ते ९ असे गट करण्यात आले होते लहान गटातुन प्रथम क्रमांक सृष्टी आमले, दुसरा क्रमांक कुणाल भेगडे, तिसरा क्रमांक अनुष्का देवकर, तर मोठा गटातुन प्रथम क्रमांक सेजल मेंगडे, दुसरा क्रमांक सिद्धी वाकणकर, तिसरा क्रमांक सानिका शेळके या विद्यार्थ्यांना ट्रॉफी पारितोषिक देण्यात आले. हायस्कूलचे मुख्याध्यापीका सावंत मॅडम व बनसोडे सर, मोकणे सर, वंजारे सर, गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मामासाहेब मोहोळ विद्यालय शेरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहु संख्येने सहभाग घेतला होता. यामध्ये लहान गटाच्या ५ ते ७ मुली व मुले सहभागी झाली होती. गटातुन प्रथम क्रमांक प्रगती वैराट, द्वितीय क्रमांक दिव्या भालेराव व तृतीय क्रमांक अंकिता जामकर या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पारितोषिक देण्यात आले.
हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद पिंगळे सर व गायकवाड मॅडम खोराटे मॅडम व घनगड प्रतिष्ठानचे सदस्य नितेश खानेकर, अमित खेगरे, गणेश खानेकर, हर्षद खानेकर, निलेश घायतडकर, श्रीधर मालपोटे, श्रीधर खानेकर उपस्थित होते.
घनगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना गड किल्ले संवर्धन तसेच विद्यार्थ्यांना व्यासपीठ कसे मिळवुन देता येईल या विषयी मार्गदर्शन केले .