पुणे I झुंज न्यूज : माजी नगरसेवकाचा मुलगा व शिवसेना विभाग प्रमुखाचा अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री बुधवार पेठेत तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. यामुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. अद्याप त्या हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दीपक विजय मराटकर (३२, गवळी आळी, बुधवार पेठ परिसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मराटकर हे शिवसेना विभाग प्रमुख होते. त्यांचे वडील विजय मराटकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झालेले आहे.
दरम्यान रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास दिकप हे गवळी आळी परिसरात थांबले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. हल्लेखोर पसार झाले. नागरिकांनी दीपक यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्यांचा पहाटे साडे तीन वाजता मृत्यू झाला. यानंतर या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरली. शहरात शिवसेनेच्या विभाग प्रमुखाचा खून झाल्याने तुफान खळबळ उडाली आहे. दरम्यान अद्याप तरी हल्लेखोर पकडले गेलेले नाहीत.
“दिकप यांचा काही जणांशी एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे.”