अहमदनगर I झुंज न्यूज : जागतिक समस्येचा विषय असलेल्या पर्यावरण संरक्षण वर महाराष्ट्र राज्य तसेच संबंध भारत देश सह भारताबाहेर इतर १८ देशांत पर्यावरण संरक्षण, पर्यटन विकास, आरोग्य, शैक्षणिक तसेच कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या, जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या, आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था तसेच राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्था यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणेच जेष्ठ समाजसेवक लोकपाल जनक पद्मश्री पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब जी हजारे यांच्या उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे राष्ट्रीय हिवाळी अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.
या हिवाळी अधिवेशना निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण संरक्षण, समाजसेवा, कृषी, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य, संप्रदाय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या समाज बांधव यांना राष्ट्रीय पुरस्कार ने आदरणीय अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून IFS, मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री.रंगनाथजी नाईकडे, से.नी.विशेष पोलीस महानिरीक्षक, IG,श्री.डॉ.विठ्ठलरावजी जाधव, शिर्डी विधानसभा मतदार संघाचे मा.खासदार श्री.भाऊसाहेबजी वाकचौरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस उप अधिक्षक,फोर्स वन युनिट चे संतोषजी गायके, अहमदनगर सेवानिवृत्त इंडियन आर्मी जवान तसेच आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय निरीक्षक मा.मेजर महेंद्रजी सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.श्रीमती अपर्णाताई खाडे, संस्थेच्या राष्ट्रीय महिला निरीक्षक सौ.करुणाजी गगे बांगर तसेच संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण अधिवेशन कार्यक्रम चे नियोजन संस्थेच्या राष्ट्रीय महिला महासचिव सौ.करुणाजी गगे व संस्थेचे ठाणे जिल्हा अधिकारी कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. यासह सूत्रसंचालन ची जबाबदारी निवेदिका सौ.करुणाजी गगे मॅडम,सौ.नलिनीजी गायकवाड मॅडम तसेच श्री.मुकेशजी दामोदरे यांनी केले.
याप्रसंगी डॉ.अण्णासाहेब जी हजारे तसेच प्रमुख मान्यवर यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षण,समाजसेवा या संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले.