वाकड I झुंज न्यूज : वाकड गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला एक दिवशीय म्हणून उपोषण करून जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला होता. या उपोषणास दिवसभरात असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावत सहभाग दर्शविला.
एक मराठा लाख मराठा. आपल्यासारखे लाख संपतील चालेल पण मनोज जरांगे पाटील सारखा लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे. हा एकाच नारा सर्वत्र ऐकू येत होता.
आज एकवेळचं अन्न नाही मिळलं तर आपली चिडचिड होती. परंतु जरांगे पाटील यांनी अन्न-पाणी आणि उपचार सुद्धा नाकारलेत. आपल्याला अशा इमानदार लोकांची गरज आहे. आरक्षणाचं जे काय होईल ते होईल… पण निष्ठेने लढणाऱ्या, आपल्या बांधवांची साथ द्या. अशी हाक उपस्थित मराठा बांधवानी व मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी मोहनशेठ कलाटे, संतोष कलाटे, विनायक गायकवाड, श्रीनिवास कलाटे, विष्णुपंत कस्पटे ,सचिन लोंढे, आकाश बोडके, अविनाश कलाटे, नितीन कलाटे , पांडुरंग शेडगे, विजय कलाटे, कमलेश विनोदे, धनंजय कलाटे, रणजीत कलाटे, विक्रम विनोदे, महेश विनोदे, विक्रम कलाटे, निखिल भंडारे, विनोद कलाटे, पाटील पुरू सर यांसह अनेक मान्यवर उपोषणास सहभाग घेतला.