पुणे I झुंज न्यूज : चित्रपट आणि नाट्य संस्था (महा. राज्य) अँटी क्राईम अँड अँटी करपशन्स सेल इंडिया व महिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना (भारत). यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव स्त्री शक्तीचा सन्मान असामान्य कर्तृत्वाचा या संकल्पनेतून वर्दीतील नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने सांगवी पोलिस स्टेशन, पिंपरी पोलिस स्टेशन, वाकड पोलिस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, बालगंधर्व पोलीस चौकी (डेक्कन), खडक पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन अशे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ९ पोलीस स्टेशन ला जाऊन वर्दीतील नवदुर्गा कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकारी यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी चित्रपट आणि नाट्य संस्था (महा.राज्य) चे संस्थापक अध्यक्ष शुभम शशिकांत मोरे, सचिव चेतन गिरी, उपाध्यक्ष कुणाल देशमुख, निर्माते संजय भोसले, सिंधू थिएटरस् चे मयूर चव्हाण, संचालिका अभिनेत्री अनुश्री ढम, अभिनेत्री रश्मी दहीरे, अँटी करप्शनचे अवी लोंढे, रंगभूषाकार ओमकार जाधव, संकल्प भोसले, अनिल गायकवाड, सूरज लोणकर, केतन जाधव, अनिकेत जगताप, केतन सवाणे, अक्षय वाघमोडे व दोन्ही संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.