पुणे I झुं न्यूज : ड्राइव्ह गो ग्रीन सीएसआर प्रोजेक्ट अंतर्गत एच. डी.एफ.सी.बँक, होलसेल बँकिंग ऑपरेशन, मॉडेल कॉलनी आणि आनंदवन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १० हजार रोपांचे रोपण करण्यात आले.
बँकेच्या गो ग्रीन उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांनी जवळपास १२०० प्रकारच्या १०००० रोपांचा रोपण केले असून पुढील ३ वर्षांसाठी आनंदवन फाऊंडेशनद्वारे या वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची काळजी घेतली जाणार आहे.
या कार्यक्रमाला पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री एन आर प्रवीण आणि वन विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी, बँकेचे कर्मचारी आणि फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.