पिंपरी I झुंज न्यूज : कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य मंत्री यांनी नागरिकांच्या हिताचे अनेक आदेश प्रशासनाला दिले होते. पण त्या आदेशाची अंबलबजावणी अजून झालेली नाही. तरी लवकरात लवकर सर्व आदेश अमलात यावे यासाठी छावा क्रांतिवीर सेनेकडून सह.आयुक्त पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय जोरी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संजय ठाकरे, विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष राजु फाले, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष ईशा साळुंखे, मिलिंद कांबळे आणि पुणे जिल्हा छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हणले आहे कि, विविध सामाजिक संस्था प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. वायसीएम येथे मशिनही कमतरता असल्याने नागरिकांना २-३ दिवस वाट पाहावी लागते. नागरिकांना सध्या प्लाझ्माची आवशक्यता भासत असून वायसीएम येथे मोफत प्लाझ्मा मिळत असल्याने रुग्ण गर्दी करत आहेत. नविन मशिन व टेक्निशियन कामगारांची गरज आहे. अत्यावश्यक गरज असल्यास प्रायव्हेट हाँस्पिटल मधुन प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
“कमित कमी १० बेड असलेल्या प्रत्येक मल्टिस्पेशिलिटी हाँस्पिटलला माहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना राबवावी जे हाँस्पिटल राबवित नसतील तर त्यांची मान्यता रद्द करावी, प्राव्हेट हाँस्पिटलचे आँडिट पारदर्शक पणे होत नाही, प्रत्येक हाँस्पिटल मधिल बेडची माहिती हाँस्पिटल बाहेर होल्डिंग बोर्ड लावावे, प्लाझ्मासाठी रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्लाझ्मा मशीन उपलब्ध करुन देवुन टेक्निशियन, हेल्पर, सफाई कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावेत. अश्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.”