जागृत नागरिक महासंघाची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : पहाटे 3:40 वाजता रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी गेलेल्या रुग्णाला रुग्णसेवा नाकारणाऱ्या व रुग्णहक्क सनदेचा अवमान करणाऱ्या जिजामाता रुग्णालयाच्या बेजबाबदार व उर्मट डॉक्टर वैशाली यांच्यावर तात्काळ निलंबनाच्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने पिं चिं मनपाचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांच्याकडे केली आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव म्हणाले कि, ज्या डॉक्टरांना रुग्णसेवा माहीत नाही तसेच रुग्णहक्क सनद माहित नाही अशा डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. पिं चिं मनपाच्या उत्तम रुग्णसेवेच्या लौकिकास काळिमा फासणाऱ्या संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे खडसावून सांगितले.
डॉक्टर गोफणे यांनी तक्रार अर्ज स्वीकारून डॉक्टरांची चूक मान्य केली व संबंधित डॉक्टरवर लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी. अध्यक्ष नितीन यादव, राजेश्वर विश्वकर्मा, उमेश सणस, अशोक कोकणे, प्रकाश पाटील यांसह महासंघाचे सदस्य उपस्थित होते.