प्रा. पंडित हिंगे,
(पत्रकार व अध्यक्ष पुणे जिल्हा मराठी वृत्तपत्र लेखक संघ हडपसर पुणे)
अवघ्या दोन दिवसात १९ सप्टेंबर २०२३ रोजी श्री मंगल मूर्ती चे संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी आगमन होणार आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळ सजावट करण्यासाठी आता लवकरच कामाला लागणार आहेत. तथापि एक महत्त्वाची गोष्ट गेले चार पाच वर्षांत अनुभवाला येत आहे. ती म्हणजे रहदारीचे रस्त्यावर मंडळाचे मंडप आलेले असतात. त्यामुळे कामावर जाणारे शाळकरी मुलांच्या बसेस तसेच पीएमपीच्या बसेस आणि कामावर जाणारे दुचाकी चारचाकी वाहने यांना या मंडळांनी रस्त्यावर घातलेल्या मंडपाचा अडथळा निर्माण होतो. प्रसंगी अपघात होतात.
तरी मंडळांना नम्र विनंती की त्यांनी आपले मांडव सजावट रस्त्यावर आणू नये. गणेशोत्सवाचा आनंद आपण सगळ्यांनी मिळून घ्यावयाचा आहे तर आपले मंडळ सर्वार्थाने आदर्श कसे होईल. महिला/ज्येष्ठ नागरिक/लहान मुले यांना जाता येता त्रास होईल याची दक्षता सर्वच लहान मोठ्या मंडळांनी घेणे आवश्यक आहे.
दोन दिवसांपूर्वीच पुण्यनगरीचे ठिकाणी एका गणेश मंडळाने टाकलेला मंडप हा निम्या पेक्षा जास्त रहदारीच्या रस्त्यावर टाकलेला दिसला. खूप वाईट वाटले. अजूनही आम्हाला सामाजिक जाण जागृती का येत नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. मला वाटते अजूनही वेळ गेलेली नाही. मंडळांनी सगळ्यांचा विचार करून आपला सर्वांचा हा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव कसा आदर्श करता येईल यासाठी आपण सारे मिळून कसोशीने प्रयत्न करू या आणि मंडळांचे कार्यकर्ते बरोबरच नागरिकांना देखील सहभागी होण्यासाठी आनंद वाटेल.
तरी या छोट्या ना पण गोड विनंतीचा सर्व गणेशोत्सव मंडळ यांनी आदर करावा आणि पुण्यातील आदर्श गणेशोत्सव म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिध्दी मिळेल.