वाकड पोलिसांनी खुन करणाऱ्या आरोपींचा इरादा पाडला हाणून ; दोघे अटकेत…
वाकड I झुंज न्यूज : सहा महीन्यापुर्वी युवकाचा खून करणा-या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खुन लपविण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न पोलीसांमुळे अयशस्वी ठरवला असून वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ही कामगिरी केली आहे. सिध्दांत रतन पाचपिंडे (वय २३ वर्ष, रा. गुरुनानक नगर कॉलनी नं. ०३, रहाटणी), व २) प्रतिक रमेश सरवदे (वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी, कुदळवाडी, चिखली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव परीसरातील दिनेश दशरथ कांबळे (वय २६ वर्ष, रा. एकता कॉलनी, थेरगाव), हा इसम मागील ६ महिन्यापासून मिसिंग असलेबाबत त्याच्या आईने तक्रार दिली होती. त्यावरून वाकड पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २६८ / २०२३ प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली होती. एक तरुण ०६ महीन्यापूर्वी मिसींग झाला असुन त्याची हरविले तारीख व पोलीस ठाणेमध्ये तक्रार दिलेली तारीख यामध्ये मोठी तफावत असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अमलदार मिसींगचा शोध घेत असताना मिसींग व्यक्तीचे आई वडील यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा दिनेश हा कोणताही कामधंदा करीत नव्हता. तसेच यापूर्वीही तो तीन ते चार वेळा १० ते १५ दिवसांकरीता त्याच्या मित्र परिवाराकडे राहण्यास जावून परत आला होता. मात्र, यावेळी त्याने घरातील त्याच्या वडीलांची सोन्याची चैन न सांगता घेवुन गेला होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला जाब विचारला असता दोन दिवसामध्ये चैन परत आणतो, असे सांगुन तो घरातून निघून गेला होता. तो अदयाप परत आला नाही.
मिसींग व्यक्तीचा मित्र ज्ञानेश्वर बिभीषण मोटे व श्रवण ज्ञानेश्वर मोटे (दोघे रा. अशोका सोसायटी, रूम नं. २१. थेरगाव) यांच्याकडे चौकशी केली असता (दि. १५/०३/२०२३) रोजी रात्री ९:३० वा. चे सुमारास काळेवाडी फाटा शेजारील ग्राऊंडवर दिनेश कांबळे हा त्याचे मित्र सिध्दांत रतन पाचपिंडे व प्रतिक रमेश सरवदे यांचेसह दारु प्यायला बसला होता. त्यावेळी त्यांचेमध्ये भांडण झाले असल्याची माहिती त्याला मिळाली होती.
परंतु दिनेश सध्या कुठे आहे याबाबत त्याला माहीती नाही. त्यामुळे इसम नामे १) सिध्दांत रतन पाचपिडे, वय २३ वर्ष, रा. गुरुनानक नगर कॉलनी नं. ०३, रहाटणी, पुणे व २) प्रतिक रमेश सरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी कुदळवाडी, चिखली, पुणे यांना तांत्रीक तपासाद्वारे ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, दिनांक १५/०३/२०२३ रोजी रात्री दिनेश कांबळे हा त्यांचे सोबत होता. त्या तिघांनी सुरवातीस पिंपरी मध्ये दारु पिली त्यानंतर ते तिघे अॅक्सेस मोपेड वरून काळेवाडी फाटा येथे आले तेथे असणारे मोकळे मैदानात पुन्हा दारु पिणेस बसले होते. त्यावेळी दिनेश काळे याने प्रतिक सरवदे याचे पत्नीबाबत अश्लिल भाषा वापरण्यास सुरुवात केलने त्यांचेत भांडण सुरु झाले. भांडणात प्रतिक रमेश सरवदे व सिद्धांत रतन पाचपिंडे यांनी दिनेश याचे डोक्यात सिमेंटचा गडू मारुन त्यास जखमी केले व तेथून निघून गेले परंतु काही वेळाने ते दोघेही रात्री ११.०० वा. मा. पुन्हा माघारी आले व जखमी दिनेश यास अॅक्सेस मोपेडवर मध्ये बसवुन औध नंतर दापोडी येथे घेवून जावून दि. १६/०३/२०२३ रोजी ०२.१५ वा.सु. पुणे मुंबई रोडवर मेट्रो पोल नंबर एन.पी. ०९ चे जवळ, कासारवाडी, पुणे येथे नाशिक फाटा ब्रिज वरून दिनेश कांबळे याला खाली फेकून देवून त्याचा खुन केला असे सांगीतले.
दिनेश कांबळे यास ब्रिजवरुन खाली फेकुन दिल्याने तो जागीच मयत झाला. दिनेश कांबळे हा जुना पुणे मुंबई रोडवर मयत अवस्थेत मिळुन आला परंतु त्याचे अंगावर त्याची ओळख पटविणेबाबतचा कोणताच पुरावा नसल्याने बेवारस व्यक्तीचा अपघात बाबत भोसरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२६/ २०२३ भादंवि कलम ३०४(अ), २७९, १८४,१३२ (१) (सी), १९९, १७७, १३४ (ए), १३४ (बी) प्रमाणे दिनांक १६/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करणेत आला आहे.
त्यामुळे १) सिध्दांत रतन पाचपडे, वय २३ वर्ष, रा. गुरुनानक नगर कॉलनी नं. ०३, रहाटणी, पुणे व २) प्रतिक रमेश सरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी, कुदळवाडी, चिखली, पुणे यांना ताब्यात घेवून भोसरी पोलीस स्टेशनचे गुन्हया मध्ये मनुष्य वधाचा प्रकार असल्याचे व आरोपी निष्पन्न झालेबाबत रिपोर्ट सादर करून आरोपी ताब्यात देणेत आले आहेत. सदरबाबत पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशन करीत आहे. वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी मिसिंग तक्रार दाखल झाल्यापासून दिवस-रात्र अथक परिश्रम करुन ३६ तासात सदर प्रकरणाचा उलघडा केला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे साो, सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो. पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पाहवा, संदीप गवारी, पोहवा स्वप्निल खेतले पोहवा दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोना प्रशांत गिलबीले, पोना, अतिक शेख, पोना, विक्रांत चव्हाण, पोना, राम तळपे, पोशि अजय फल्ले, पाशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि कांतेय खराडे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि.०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.