पिंपरी I झुंज न्यूज : एका गरजू कामगाराला योग्य वेळी मदत केल्याबद्दल आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जागृत नागरिक महासंघाला निश्चित आनंद होत आहे अशा सर्व गरजू नागरिकांच्या पाठी जागृत नागरिक महासंघ निश्चितपणे खंबीरपणे उभी आहे अशा भावना अध्यक्ष नितीन यादव यांनी व्यक्त केल्या.
मारुती बाळू बोराडे एक कंपनी कामगार 2021 साली रस्त्याने पायी जात असताना एका कार ने धडक दिल्यामुळे त्यांच्या मांडीचे हाड मोडले त्यांना गंभीर अवस्थेत मोहन नगर मधील ईएसआय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले पण त्यावेळी कोविडने गंभीर रूप धारण केले होते आणि सदरचे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले होते त्यामुळे त्यांना ऍडमिशन नाकारण्यात आले.
त्यावेळी बोराडे यांनी तिथूनच जागृत नागरिक महासंघ अध्यक्ष नितीन यादव यांना फोन करून मदतीची विनंती केली. परिस्थितीचा गांभीर्य ओळखून यादव यांनी इएसआय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंभारे साहेब यांच्याशी चर्चा केली. तिथून पुढे पाचच मिनिटात बोराडेना साहेबांनी बोलावून घेऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सोमाटने फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते.
त्या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली व पुढील काही महिन्यात ते ठणठणीत बरे झाले . पवना हॉस्पिटल ने त्यांना काही औषधे बाहेरून आणण्यास सांगितले होते. जवळपास 30 हजार रुपये किमतीचे औषधे बाहेरून घेतली होती व याबाबतची सर्व बिले बोराडेंनी ईएसआयच्या मुंबई कार्यालयाला पाठवले होते पण कोविडमुळे सदरची बिले कार्यालयाला मिळाली नाहीत. पुढील पाच ते सहा महिने जागृत नागरिक महासंघाने याचा अखंड पाठपुरावा करून या बिलावरील रक्कम बोराडे यांना परत मिळऊन दिली.
मधल्या काळात बोराडे यांना घरगुती अडचणीमुळे नितीन यादव यांना भेटता आले नाही तथापी नुकतेच मारुती बोराडे यांनी नितीन यादव यांची भेट घेऊन आपल्या एका फोनमुळे माझे जीवन बदलून गेले अन्यथा आज मला एका पायावर आयुष्य काढावे लागले असते असे बोलून गुलाबाचे पुष्प देऊन आभार मानले.