वाघोली I झुंज न्यूज : वाघोली येथे भारतीय जनता पक्ष आयोजित आणि केतनभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल सातव आणि मित्र मंडळाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. यात मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, हाडांची तपासणी इत्यादी अनेक उपक्रम राबविण्यात आले.
यासोबतच जगदंब नंदन बागेमध्ये जगदंब समूहाच्या सदस्यांनी झाड लावण्याचा उपक्रम चालू ठेवला. शिवप्रेमी दिलीपराव देवकर यांच्या मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई देवकर यांच्या स्मरणार्थ व रामवाडीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव गलांडे पाटील यांच्या स्मरणार्थ चिंचेची झाड लावली.
वाघोली परिसरामध्ये अनेक उपक्रम घेण्याचा संकल्प या मित्र परिवाराने करण्यात आला आहे. अतिशय नियोजनबद्ध सर्वसामान्य कुटुंबातील माता भगिनींना आणि जेष्ठ नागरिकांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे. डी वाय पाटील हॉस्पिटल आणि वाघोली येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर उपक्रम संपन्न झाले.
जिल्हा परिषदेचे मा सदस्य व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल दादा पाचरणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते घोडगंगा कारखान्याचे संचालक कैलास पाटील सोनवणे, शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते दौलतराव पायगुडे, युवा नेते मार्केट कमिटीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, वाघोलीचे मा सरपंच वसंतराव जाधवराव, युवा नेते संग्राम जाधवराव, चाचा जाधवराव, पायगुडे बंधू, पंचक्रोशीतील सर्व पक्ष मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलराव सातव पाटलांनी केले तर सर्वांनी केतन जाधव यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा दिल्या.