शिरूर I झुंज न्यूज : शिरूर नगरपरिषदे समोरील पुणे-नगर रस्त्यावर दोन्ही बाजूने बेकायदेशीर पणे अस्त-व्यस्त वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत असून. त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना अडथळा निर्माण होत होत.
प्रशासनाने रस्त्याला मोकळा श्वास घेता यावा यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे , मनसेचे मा. शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहीत शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी शिरूर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
पुणे- नगर रस्त्याला कोठेही फुटपाथ शिल्लक नसल्याने ,गावातील नागरिकानां, महिलाना, विद्यार्थ्यांना, वृद्धाना रस्त्याच्या मध्यातुनच मार्गक्रमण करावे लागते.त्यामुळे निष्पाप नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे.
अपघातांच्या अनेक घटना शिरूर शहरात घडलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुतर्फा वाहने उभी राहिल्यामुळे मोठ्या वाहनांना कसरत कसरत करत मार्ग काढावा लागतो आहे. या घटनांचा गांभीर्याने विचार करून रस्त्याला मोकळा श्वास घेण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे निवेदनात म्हणले आहे.