मुळशी I झुंज न्यूज : बावधन येथील प्रगतशील शेतकरी व बावधन ग्रामपंचायत माजी सदस्य भगवान गणपत बांदल यांचे वयाच्या 105 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भगवान गणपत बांदल यांच्यामागे पत्नी, 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दिनांक 28 जुलै रोजी बावधन येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत झाला.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक, हिमालय नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व भाजप मुळशी तालुका कार्यध्यक्ष राजेंद्र बांदल आणि प्रगतशील शेतकरी सुरेश बांदल यांचे ते वडील होते तर पेरिविंकल स्कुलच्या संचालिका रेखा बांदल यांचे ते सासरे होते.