8 ते 9 आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा
मुंबई I झुंज न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. मात्र या चर्चाना शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही समर्थकांसह बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. मात्र या चर्चाना शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावल्या आहेत.
या केवळ अफवा आहेत. “मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदारांची बैठक बोलवली होती, तिथे या मोठ्या नेत्यांव्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. त्यामुळे आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे की जी चर्चा तिथे झालीच नाही, तिथे असं काही घडलंच नाही, त्या गोष्टी माध्यमांना कोण सांगतंय? मी माध्यमांना हात जोडून विनंती करतो की, तुम्ही आधी खात्री करा. आमच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना विचारा. कारण आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. तसेच मुख्यमंत्रीही नाराज नाहीत. ज्यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार राहिले आहेत ते लोक आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची खोटी अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका,” असं शंभूराज देसाई म्हणाले.