पिंपरी I झुंज न्यूज : पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शिधापत्रिका कार्यालयाने ऑफलाईन अर्ज प्रक्रिया बंद केली आहे. मात्र अद्यापक शिधापत्रिकेची ऑनलाइन वेबसाइट सुरू केली नसल्याने नागिरकांची तारांबळ होत आहे. तरी लवकरात शिधापत्रिका कार्यालयाने ऑनलाईन सुविधा सुरु करावी अशी मागणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संस्थेचे राष्ट्रीय कोषाध्यक्षरामराव नवधान, अध्यक्ष महा.राज्यसुभाष कोठारी, उपाध्यक्ष सरचिटणीस प्रदेश दिलीप टेकाळे, सहसचिव. राज्याचे मुनीर शेख, लक्ष्मण दवणे उपाध्यक्ष महाराज्य, ओंकार शेरे अध्यक्ष पुणे जिल्हा, अध्यक्ष महिला पुणे जिल्हा स्मिता गायकवाड, उपाध्यक्ष महिला डॉ. स्मिता भोसले, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा संजयकुमार कांबळे, सरचिटणीस पुणे जिल्हा अविनाश रानवडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा अशोक वाबळे, संघटक पुणे जिल्हा अशोक गजभर, उपाध्यक्ष पी.सी. शहर सतीश भारती यांनी पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 18 मे 2023 पासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शिधापत्रिकेचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. रेशनकार्डच्या सर्व कामांसाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण ही वेबसाइट काम करत नाही. संकेतस्थळ कार्यान्वित नसले तरी शिधापत्रिका मंडळ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ऑफलाइन अर्ज येणे बंद झाले आहे. शिधापत्रिकेचे कोणतेही काम नसल्याने शालेय प्रवेश, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन कॉमिलर प्रमाणपत्र, बेघर योजनेचे काम, अपंगत्व, श्रावणबाळ योजना, घरकुल आदी कामाचे दाखले शिधापत्रिकेशिवाय मिळत नाहीत. त्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत. रेशनची कामे बंद करून गोरगरिबांचे नुकसान होत असल्यास मनमानी कारभार करणाऱ्या व गरिबांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरीत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
रेशनकार्ड वेबसाइट उघडून ऑफलाइन अर्ज प्रक्रिया थांबवून केवळ पाच जिल्ह्यांसाठी पुणे येथील विभागीय कार्यालयातून ऑनलाइन अर्ज घेतले जातात. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात नवीन शिधापत्रिका जारी करणारी वेबसाईट किंवा इतर कोणतेही काम उपलब्ध नाही. केवळ पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने ही वेबसाइट का सुरू केली आहे. साइट देखील उघडत नाही, ती सतत बंद असते. MITE कार्यान्वित झाले असले तरी विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेतले जावेत. तसेच शिधापत्रिकेवर मंडळ कार्यालयाने ऑनलाईन स्वाक्षरी व शिक्का मारून घ्यावा. रेशनकार्ड ऑनलाइन काढले तर सर्कल कार्यालयात सही शिक्क्यासाठी का जावे, डिजिटल रेशनकार्डच काढावे. असे आवाहन देखील केले आहे.