सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएन्सर आणि एंटरटेनर उल्हास कामठे, सुमित चव्हाण व सानिया निकम प्रमुख भूमिकेत
पिंपरी I झुंज न्यूज : प्रसिद्ध मालिका व चित्रपट लेखक व दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांची ‘मुक्ती’ या हिंदी वेब सीरिजचा बोलबाला गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर विषयावर आधारित ही वेब सीरिज नुकतीच ‘कहाणी’ या यु ट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मुक्ती’ ही सीरिज रिलीज होताच तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून प्रेक्षकांकडून या वेब सीरिजचं कौतुक होताना दिसत आहे.
या वेब सिरीज चे शुटींग काही दिवसांपूर्वीच शिरूर येथे पार पडले आहे. या वेबसिरीज मध्ये सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएन्सर आणि एंटरटेनर म्हणून गाजत असलेले उल्हास कामठे, सुमित चव्हाण आणि सानिया निकम या कलाकारांनी प्रमुख भूमिका निभावली आहे.
यासोबतच महिमा इंदलळकर, स्विटी शितोळे, सागर पवार, राजू चव्हाण, नलिनी म्हालारा, मंदाकिनी चव्हाण, रश्मी राजे, अनिरुध्द देवडीकर, नयना राणे, सुरज म्हस्के, धीरज म्हस्के, अर्पिता जोगी, वैशाली जगताप, वैशाली गाडेकर, रवींद्र जाधव, प्रकाश धायगुडे, सुवर्णा माने या कलाकारांनी आपल्या छोट्या मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांना भुरळ पाडली.
मुक्ती वेब सिरीज च्या निर्मितीसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कविता चिपळूणकर, कार्यकारी निर्माता भाग्यश्री घेगडे, प्रोडक्शन स्वप्नश्री क्रिएशन, प्रोडक्शन हेड स्वप्नील घेगडे, प्रोडक्शन मॅनेजर शुभम देठे, मेकअप अतुल शिधये, चेतन दळवी, हेअर ज्योती सोनवणे, लाईट साक्षी वाणी व कॉस्ट्यूम जयश्री महिरे यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.
‘मुक्ती’ ही एक सस्पेन्स थ्रिलर ड्रामा सिरीज आहे व तिची कथा आणि त्यातील कॅरेक्टर्स प्रेक्षकांना खुप आवडतील महाराष्ट्रात घडणारी गोष्ट मुद्दामच आम्ही हिंदीमध्ये तयार करतो आहोत जेणेकरून ती भारतभरातील प्रेक्षकांना बघता येईल असेही ते म्हणाले. मुक्ती च्या पहिल्याच सिझनचा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता. दुसऱ्या सिझनची तयारी हि सुरु करणार आहोत.
– (जालिंदर कुंभार : लेखक दिग्दर्शक)