दौंड I झुंज न्यूज : भरतगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा सुभाष टेमगिरे यांची निवड करण्यात आली. त्यांनी कार्यकर्त्यांसह आमदार राहूल कुल गटात प्रवेश केला.
भरतगाव ग्रामपंचायतीत ९ सदस्य आहेत. मागील निवडणुकीत कुल गटाचे ४ सदस्य निवडून आले होते, तर माजी आमदार रमेश थोरात गटाचे ३, तर २ अपक्ष निवडून आले होते. उमेदवार पळवापळवीच्या राजकारणात थोरात गटाकडे सहा सदस्य झाले. सुप्रिया हाके यांची सरपंचपदी निवड झाली. मात्र, त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आला. त्यानंतर झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत मनीषा टेमगिरे यांची निवड झाली.
माजी उपसरपंच विलास जगदाळे यांनी सरपंच मनीषा टेमगिरे, सदस्य शंकर जगदाळे व पूजा हाके यांचा आमदार कुल यांच्या उपस्थितीत प्रवेश घडवून आणला. त्यामुळे भरतगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा कुल गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
या प्रसंगी आमदार राहूल कुल, माऊली ताकवणे, विलास जगदाळे, उपसरपंच अजित थोरात, अक्षय ताम्हाणे, शंकर जगदाळे, पूजा हाके, साधना जगदाळे, बाबासाहेब कारंडे, भाऊसाहेब टेमगिरे, स्वप्निल टेमगिरे, विशाल जगदाळे आदी उपस्थित होते.