चिंचवड I झुंज न्यूज : जुन्नर तालुका मित्र मंडळ ( पुणे) ची सर्वसाधारण सभा शाहूनगर येथील पिरॅमिड सभागृहात मोठ्या उत्सहाच्या वातावरणात नुकतीच पार पडली शाहूनगर येथे मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सर्वसाधारण सभेसाठी मंडळाचे जेष्ठ सदस्य सदाशिव डुंबरे, सीताराम कुऱ्हाडे, नागेश तितर, आर.जी. जाधव, बी.पी. एरंडे, सुदाम शिंदे, उत्तम महाकाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतुळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी जेष्ठ सदस्य सदाशिव डुंबरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले ३० वर्षापूर्वी आम्हीं पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील जुन्नर तालुक्यातील लोकांना एकत्र करून संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न करून शिवनेरी मंडळाची स्थापणा केली होती. पण नंतर या जुन्नर तालुका मित्र मंडळाचे सामाजिक काम आणि उपक्रम पाहून आम्हीं मंडळ जुन्नर तालुका मित्र मंडळात समाविष्ट झालो. त्यानंतर आजपर्यंत मंडळाचे सामाजिक कार्य आणि उपक्रम नावाजण्यासारखे आहे. याचा आम्हांला अभिमान आहे.
मंडळाचा पाच वर्षाचा कार्यअहवाल मंडळाचे खजिनदार दीपक सोनवणे यांनी विस्तृतपणे मांडला. मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना मंडळाच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी आणि भविष्यातही घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम आणि सामाजिक कामाविषयी माहिती दिली. कार्याध्यक्ष रोहित खर्गे यांनी मंडळाच्या आजपर्यंतच्या संघटनात्मक आणि केलेल्या सामाजिक कार्याचा उजाळा दिला.
सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंडळाच्या कार्याची दखल घेत आर.जी.जाधव, विक्रम थोरवे, निलेश बोरकर, सावळेराम भोर, नागेश तितर, सुदाम शिंदे, बी. पी. एरंडे, अँड महेश गोसावी, अँड तुषार पाचपुते, मुकुंद आवटे, निलेश मुटके, उल्हास पानसरे, शशिकांत आरोटे, योगेश आमले, वसंत कुटे, नितीन शिंदे, दत्तात्रय बोऱ्हाडे, यांनी मंडळाच्या कार्याविषयी मनोगत वेक्त केले.
प्रास्ताविक उपाध्यक्ष अँड संतोष काशीद यांनी केले. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव नवनाथ नलावडे यांनी केले तर आभार मंगेश कुटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अण्णासाहेब मटाले, इंद्रजित पाटोळे, सुनील पाटे, उत्तम महाकाळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने सभेची सांगता झाली.