पुणे I झुंज न्यूज : लेखक कवी आपल्या कथा, कविता आणि गझल इत्यादी साहित्य कलांचे सादरीकरण करण्यासाठी राज्यभर संमेलने करत असतात. आज फक्त सामाजिक माध्यमातून प्रसिद्धी मिळवताना ते दिसत आहेत. इतरांचे विविध साहित्य वाचून प्रेरणा घेणे तसेच नवोदितांना प्रोत्साहित करणे राहिले नाही. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव दिन हा आपण रोजच साहित्यांच्या सन्मानाने केला पाहिजे. तोही आपल्या घरापासून समाजापर्यंत वागण्या बोलण्यातून झाला पाहिजे. तरच भाषा समृद्ध होईल. असे मत साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिका साहित्यिक कट्टा हडपसर तेथील राममनोहर लोहिया उद्यानात साहित्य सम्राटाच्या १६२ व्या कविसंमेलनात अष्टुळ बोलत होते. त्यावेळी अध्यक्षस्थानी शब्दकवी राहुल जाधव आणि प्रमुख पाहुणे गोरख पालवे मंचावर उपस्थित होते.या कविसंमेलनामध्ये पुणे जिल्हा आणि पर जिल्ह्यातील म्हणजे पुणे, संभाजी नगर, लातूर, मुंबई, बारामती, नसरापूर नाशिक दौंड, वालचंदनगर, आळंदी येथून आलेल्या पंचेचाळीस कवी, कवयित्री, गझलकार यांनी सहभाग घेतला.
त्यामध्ये सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, कविता काळे, डॉ.मदन देगावकर, सुरेश धोत्रे, निरंजन ठणठणकार, बाळासाहेब गिरी, दिनेश गायकवाड, हितेश कांबळे, विलास कुंभार, आनंद गायकवाड, संजय भोर, adv उमाकांत आदमाने, प्रिया दामले, लक्ष्मण शिंदे, विजय माने, प्रमोद सुर्यवंशी, योगेश हारणे, देवेंद्र गावंडे, श्रीशैल सुतार, महेश ससाणे, प्रसन्नकुमार धुमाळ, कीर्ती बोंगार्डे, श्रीकांत पारसे, ऋचा कर्वे, शरयू पवार प्रा.अशोक शिंदे , संजय भोटे, सीताराम नरके आणि दादासाहेब सोनवणे या सर्वांच्या सदाबहार रचनांना भरगच्च रसिकांची दाद मिळाली. कविसंमेलनाचे रंगतदार सूत्रसंचालन जगदीप वनशिव यांनी तर आभार ह.भ.प.सुभाष बडधे महाराज यांनी मानले.