पिंपरी-चिंचवड मध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे बुधवारी राज्यव्यापी अधिवेशन
पिंपरी I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्यातील 28 महानगरपालिका व 369 नगरपालिका व नगरपरिषदा मधील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे होत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन उर्फ शशिकांत झिंजुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामगार प्रतिनिधी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड मध्ये अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत यावेळी प्रामुख्याने मुंबईतील कामगार नेते अशोक जाधव औरंगाबाद येथील कामगार नेते गौतम खरात नागपूरचे कामगार नेते शब्बीर विद्रोही ठाण्याचे कामगार नेते रवी राव नाशिकचे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड पुण्यातील कामगार नेत्या मुक्ता मनोहर आदिमसह राज्यभरातील साठहून अधिक कामगार नेते प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न एकाच धर्तीवरचे आहेत राज्यात अनेक छोट्या नगरपालिका व नगरपरिषदा असून तेथील कर्मचाऱ्यांची संख्या देखील खूपच कमी आहे त्यामुळे अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रश्न मुंबई येथील शासन दरबारी पोहोचवण्यात व ते सोडवण्यात अडचणी येत असतात यामध्ये या कर्मचाऱ्यांच्या व महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या एकसमान प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी म्हणून राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी संघांनी एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावरून आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे व राज्यातील या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाला अधिवेशन घेण्याचा मान मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने आजवर राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये जातीने सहभाग नोंदवला आहे व बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने अधिवेशनात चर्चिला जाणाऱ्या सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अधिकाधिक यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न राहील असा विश्वासही बबन झिंजुर्डे यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिवेशनात चर्चिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या विषयांची माहिती देताना बबन झिंजुर्डे म्हणाले की, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकेतील कायमस्वरुपी काम असणा-या सफाई सेवेतील व इतर सेवेतील ठेकेदारी पद्धत तातडीने बंद करुन आकृतीबंधामध्ये कायम कामगारांची पदे निर्माण करणे व ठेकेदारी बंद करणे
राज्यातील बालवाडी सेविका व अंगणवाडी सेविकांना मनपा सेवेत कायम करणे, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांमधील ठेकेदारांवरील कामगारांना समान काम, समान वेतन या न्यायतत्वाप्रमाणे कायम कामगारांनुसार वेतन देण्यात यावे, राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील सफाई सेवेतील स्वच्छतेचे काम करणा-या व रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचे काम करणा-या सर्व जाती संवर्गातील कर्मचा-यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागु करुन त्यांच्या वारसांना नोकरीमध्ये समाविष्ट करणे, राज्यातील अनेक महानगरपालिका कर्मचा-यांना सहावा वेतन आयोग व सातवा वेतन आयोग लागु केला असुन महानागरपालिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, सहावा व सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम अदा केलेल्या नाहीत. तरी अशा महानगरपालिकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करुन कर्मा-यांना सातवा वेतन आयोगाचा फरक अदा करणेत यावा. अशा विविध विषयांवर अधिवेशनादरम्यान चर्चा होणार आहे असे बबन झिंजूर्डे यांनी सांगितले.
या अधिवेशनासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे , आमदार आण्णा बनसोडे, आमदार संजय शिरसाट, आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,
अधिवेशनामध्ये गणेश शिंगे (नांदेड), ऍड. सुरेश ठाकुर (नवी मुंबई),
उदय भट (पुणे ), अशोक जानराव (सोलापुर), डी. पी. शिंदे (हिंगोली)
गणेश शिंगे (नांदेड), प्रकाश जाधव (पुणे), संजय भोसले (कोल्हापुर ), चरणसिंग टाक (कल्याण), रामगोपाल मिश्रा (चंद्रपुर), के. के. आंधळे (परभणी), तानाजी पाटील (सांगली), अनंत लोखंडे (अहमदनगर), विरपाल भाल (ठाणे), प्रल्हाद कोतवाल (अमरावती), विठ्ठल देवकाते (अकोला), गोविंद परब (मिरा भाईंदर), प्रविण तंत्रपाळे (नागपुर), राजेंद्र मोरे (नाशिक), प्रविण तिदमे (नाशिक), भारत बेद (मालेगांव), श्रावण जावळे (जळगाव), गोविंद परब (मिरा भाईंदर) , सुनिल कालेकर (मिरा भाईंदर), सुनिल वाळुंजकर (पंढरपुर), भगवान बोडके (गंगाखेड), संतोष पवार (कोकण), विजय तांबडे (सांगली-मिरज) , राजेंद्र सुतार (नवी मुंबई), शेषराव शिरसाट (सोलापुर), शरद कांबळे (पनवेल), बापुसाहेब सदाफुले (सोलापुर), आण्णा पाटील (इचलकरंजी), अजित मोरे (ठाणे), राजेश दुल्ला (नाशिक), सुधाकर संख्ये (वसई-विरार), भुषण कबाडी (पालघर), राकेश पाटील (मुरुड), सायमन गट्टू (सोलापुर),शरद कांबळे (पनवेल), सतिश चिंडालीया (पनवेल), नागेश कंडारे (धुळे), चेतन अंबोणकर (ठाणे), अरुण नाईक (मुंबई), दिनेश चौहान (भिवंडी), यशवंतराव देसाई (मुंबई), वामन कविस्कर (मुंबई), शैलेंद्र खानविलकर (मुंबई), दिपक खामकर (मुंबई), भारत बेद (मालेगांव), रमेश आगळे (उल्हासनगर), गजानन शेलार (नाशिक), संतोष वाघ (नाशिक), दिपक राव (भिवंडी) सुधाकर बडगुजर (नाशिक) , विश्वनाथ घुगे (चंद्रपुर), अंकुश गायकवाड (लातुर) आदि कर्मचारी संघटना पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थिती राहणार आहेत. अशी माहिती बबन झुंजूर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रत्नागिरीचे दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.