मावळ I झुंज न्यूज : चांदखेड येथील पुसाणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी जनाबाई पोपट वाजे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.
मावळचे उपसरपंच दत्तात्रय केदारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संजय आवंडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते. जनाबाई वाजे यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेविका कांचन मार्कड यांनी त्यांची बिनविरोध निवड केली.
यावेळी विक्रम वाजे, नवनाथ वाजे, निकिता वाजे उपस्थित होते. यावेळी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवक अध्यक्ष पै सचिन घोटकुले व मावळ तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस सोशल मीडीयाचे अध्यक्ष संजय शेडगे यांनी उपसरपंच जनाबाई वाजे यांना शुभेच्छा दिल्या.