(प्रतिनिधी : सुरंजन काळे)
आंबेगाव I झुंज न्यूज : शेता मध्ये काम करणाऱ्या दोन शेतकरी व पाच पाळीव जनावरांना पिसाळलेल्या कोल्हानी हल्ला केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावात घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमूळे गिरवली परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोल्हाला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
गिरवली जवळील मंदिरा शेजारी शनिवारी दु 2 च्या सुमारास शेता मध्यें काम करत असलेल्या मिलिंद हगवणे व शेजारी असलेल्या शेतामध्ये काम करत असलेले सागर गभाले यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात हगवणे यांच्या गळ्या जवळ कोल्ह्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तर गाभाले यांच्या हाताला जखम झाली आहे. हल्ला करून परत जात असताना शेतात असलेल्या पाच जनावरांना देखील चावा घेतला आहे.
या अचानक झालेल्या हल्ला ची माहीत गिरवली गावचे सरपंच संतोष सैद यांनी वनविभागाला दिली . जखमींना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच वनविभागाने ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, घाबरून न जाता पिसाळलेला कोल्हा घराजवळ किंवा शेतात दिसला की फटाके वाजवा त्यामुळे तो रानाच्या ठिकाणी पळून जाईल.