देहूरोड I झुंज न्यूज : महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत तिला धमकी देत तिचा विनयभंग करणाऱ्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
हा प्रकार ७ सप्टेंबर रोजी देहुरोड येथे दुपारी १ च्या दरम्यान घडला होता. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ईश्वर दरेकर (वय ३४ रा. पुरंदर) व ५२ वर्षीय त्यांच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फिर्यादी या देहुरोड येथील मैत्रिणीच्या घरी वाढदिवसासाठी आल्या होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी सर्वांसमोर फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमानीत केले. तसेच फिर्यादी यांचा व्यवसाय बंद करण्याची व लग्न न होऊ देण्याची धमकी दिली. उपस्थित असणाऱ्या लोकांसमोर अश्लिल हातवारे करत फिर्यादी यांचा विनयभंग केला. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.