गांभीर्य लक्षात घेऊन पूलाचे काम करा अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन ; शिवसेना उपतालुकाप्रमुख व माजी उपसरपंच अनिल पवार यांचा इशारा
शिरूर I झुंज न्यूज : कुणी पुल देता का ,आम्हाला गरज आहे , कुणी पुल बांधुन देता का ? अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन आमदार ,खासदार यांच्या कडे केली मात्र सरकारी काम वर्षेनु वर्षे थांब या म्हणीप्रमाणे येथील ग्रामस्थांना आला आहे.
चिंचणी ता शिरुर येथील पुणे आणि नगर जिल्याना जोडणारा आणि शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांना जोडणारा चिंचणी आणि बोरी ता श्रीगोंदा गावांना जोडणारा घोड नदी वर पूल होण्याची मागणी अनेक वर्षीपासुन होत आहे. मात्र पुल नसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे . या जिव घेणा प्रवासामुळे मोठा अपघात घडण्याची भिती आहे.
चिंचणी गावातील शेकडो लोक बाजारपेठ बोरी हंगेवडी कडे शेतीचे साहित्य, औषधे घेण्यासाठी जात असतात . तसेच बोरी हांगेवडी गावातील लोकांना हॉस्पिटल येण्यासाठी शिरूर शहरासाठी आणि पुण्याकडे जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. परंतु पावसाळ्यामध्ये घोड नदी ला पाणी असलेने सर्व व्यवहार ठप्प होतात . त्यामूळे या मागणी कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पूलाचे काम करावे नाहीतर ग्रामस्थ चे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उपतालुकाप्रमुख व माजी उपसरपंच अनिल पवार यांनी दिला आहे .