मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील हिंजवडी फेज-३ येथील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये दुर्मिळ अशी उदमांजर आढळून आल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या उदमांजराला प्राणी मित्रांनी कोणतीही इजा होऊ न देता अलगत शिताफीने पकडुन पौड वन अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार त्याला जंगलात सोडून जीवदान दिले आले.
रविवारी (ता. २५) रात्री ८. ३० वाजता सर्पमित्र अजित भालेराव यांना फोन आला की मांजरासारखा दिसणारा कुठला तरी प्राणी कँटीनमध्ये शिरला आहे.
ही माहिती वाईल्ड अँनिमल्स अँण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी संस्थेतील प्राणिमित्रांना देण्यात आली. त्यानुसार सर्पमित्र तुषार पवार, शेखर महाराज जांभूळकर, अजित भालेराव, तुषार जोगदंड व श्रीनिवास देवकाते सर्व टीम तिथे दाखल झालीया प्राणीमित्रांची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली. पाहणी केली असता ते जंगली उदमांजर असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वजन ५ किलो व उंची गुडघ्याच्या मानवी खालोखाल होती. याबाबत मुळशीचे वनरक्षक पांडूरंग कोपनर यांना ही माहिती देण्यात आली.
त्यांच्या सूचनेनुसार उदमांजराला पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आल्याने प्राणी मित्रांचे उपस्थितांनी आभार मानत कौतुक केले. दुर्मिळ होत चाललेले उदमांजर हा सस्तन व सर्वहारी प्राणी आहे. उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, कीटक, फळे, खेकडे हे त्याचे खाद्य आहे.
“उदमांजराच्या अंगावर काळसर व राखाडी केस असतात. उदमांजराचे वजन साधारणपणे ३ ते ५ किलो असते. उदमांजर हा निशाचर प्राणी असुन तो मानवी वस्तीजवळ व जंगलांमधे ही आढळतो. सहसा दिवसभर झाडांवरील ढोलींमधे आराम करून रात्रीच्यावेळी हा प्राणी खाद्याच्या शोधात फिरतो. उदमांजर हा सर्वहारी प्राणी असुन त्याच्या आहारात शाकाहार व मांसाहार या दोन्हींचा समावेश असतो. फळे, किटक, बेडूक, सरडे, उंदिर, खेकडे इत्यादींचा त्याच्या आहारात समावेश असतो.