पुणे I झुंज न्यूज : ऊन असो की पाऊस, कर्तव्यासाठी पोलीस कर्मचारी नेहमी धावून जातो, हे याआधीही पुण्यात पाहायला मिळालं होतं. भरपावसात ड्युटी करणारे पोलीस कर्मचाऱ्यांचे अनेक व्हिडीओ याआधीही समोर आले होते. आता आणखी एक व्हिडीओ समोर आलाय.
पुण्यात भरपावसात एका महिला वाहतूक पोलिसाने आपलं कर्तव्य पार पडलं. ड्युटीवर असताना पाण्याचा निचरा करणाऱ्यासाठी राबणाऱ्या वाहतूक पोलीस असलेल्या एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, म्हणून रस्त्यालगत साचलेल्या पाण्याचा निचरा करताना ही पोलीस कर्मचारी महिला दिसून आली आहे.
एसपीएन साबळे असं या महिला वाहतूक पोलिसाचं नाव आहे. सहकारनगर शाखेमध्ये त्या कर्तव्यावर आहेत. पुण्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला होता. गेला आठवडाभर झालेल्या पावसाने पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे महिला वाहतूक पोलिसानं स्वतःच पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केलेत.
https://twitter.com/ssidsawant/status/1570944851616870401?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1570944851616870401%7Ctwgr%5E098acba8b515fc8be5e76d6118a1616055d5afd8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fpune%2Fwatch-video-of-lady-traffic-police-constable-who-was-working-in-rains-withour-fail-to-solve-water-issue-which-has-impacted-on-traffic-au136-802523.html
‘हे माझं काम नाही, हे तर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचं काम आहे, तो आला की काय ते पाहिल’ असं म्हणण्याऐवजी या महिला वाहतूक पोलीसाने जे केलं, त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पडेल ते काम करु आणि कर्तव्य पार पडू, यासाठी या महिलेलं केलेल्या कृतीला सोशल मीडियातून अनेकांनी कडक सॅल्यूट ठोकलाय.
ऊन असो की पाऊस, कर्तव्यासाठी पोलीस कर्मचारी नेहमी धावून जातो, हे याआधीही पुण्यात पाहायला मिळालं होतं. भरपावसात ड्युटी करणारे पोलीस कर्मचाऱ्यांचे अनेक व्हिडीओ याआधीही समोर आले होते.
आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यालगत पाणी साचलेल्याचं दिसून येतंय. हे पाणी गटाताच जावं आणि वाहतूक कोंडी फुटावी, यासाठी महिला वाहतूक पोलीस कर्मचारी राबताना दिसतेय.
पाणी हटवण्यासाठी या महिला पोलीस कर्मचारीने एका झाडाच्या फांदीची मदत घेतली. अनेकदा रस्त्यावरील कचऱ्यामुळे गटारात पाणी तुंबतं आणि रस्त्यावर साचतं. ही महिला वाहतूक पोलीस फांदीच्या मदतीनेच तु्ंबलेल्या गटाराला साफ करुन पाण्याचा निचरा करता दिसून आलीय.