उल्हासनगर | झुंज न्यूज : उल्हासनगरमध्ये एन्टी करप्शन विभागाने मोठी कारवाई केली आहे. लाच मागणाऱ्या तिघांजणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण भरार आहेत. विशेष म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांनीच लाच मागितल्यामुळे उल्हानगर पालिकेत खळबळ उडाली आहे. शिवाय एन्टी करप्शनने केलेल्या कारवाईमुळे पालिकेत लाच मागणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचंही धाबं दणाणलं आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह एकूण ३ कर्मचाऱ्यांवर अँटी करप्शन विभागानं गुन्हा दाखल केलाय. एकूण 30 हजार रुपयांची लाच या तिघांकडून मागण्यात आली होती. मोडकळीला आलेलं घर दुरुस्त करणाऱ्या नागरिकाकडे पालिकेतील लोकांनी लाच मागितली होती. नागरिकाकडून ३० हजारांची लाच मागितल्याचा ठपका ठेवत तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात सहाय्यक आयुक्तांसह इतर दोघांचाही समावेश आहे.
उल्हासनगर प्रभाग समिती 4 अंतर्गत राहणाऱ्या एका नागरिकाचं जुनं घर मोडकळीला आलं होतं. त्यामुळे त्याने हे घर दुरुस्त करून पुन्हा बांधायला घेतलं. यावेळी मुकादम रतन जाधव याने या नागरिकाकडून 30 हजारांची लाच मागितली, असा आरोप केला होता.
सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी यांना देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचं ठरल्यानंतर रतन जाधव याने सफाई कामगार विजय तेजी याला ही रक्कम स्वीकारायला पाठवलं. यावेळी ठाणे अँटी करप्शन विभागाने सापळा रचून विजय तेजी आणि मुकादम रतन जाधव यांना रंगेहाथ अटक केली. तर ट्रॅप लागल्याची कुणकुण लागताच सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी हा फरार झाला.
लाच घेतल्याप्रकरणी या तिघांवरही हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंजाबी याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे पालिकेतील अधिकारी सर्रास लाच घेत असल्याचंही धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. एन्टी करप्शनने केलेल्या कारवाईमुळे आता लाचखोरांना दणका बसलाय. दरम्यान, पंजाबी यांना अटक कधी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खळबळ ! घर दुरुस्तीसाठी ३० हजाराची लाच मागणं भोवलं ; पालिकेच्या अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा, दोघांना रंगेहाथ अटक…
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com