गुंडागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं ; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाची मागणी
थेरगाव | झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यानी प्लास्टिक बॅग विरोधी कारवाईच्या नावावर चक्क एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून व्यापाऱ्याच्या गल्ल्यात हात टाकन्याचा प्रयतन करून व्यापाऱ्यालात जबर मारहाण केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचारी व्यापाऱ्याला मारहाण करत असतानाची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दादागिरी ची घटना पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक या ठिकाणी घडली आहे.
डांगेचौक या ठिकाणी हिम्मतलाल भाटी यांचं लक्ष्मी स्वीट नावाचं मिठाईच दुकान आहे. या दुकानात काल सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान प्लास्टिक विरोधी कारवाईच्या नावाखाली महापालिकेतील जवळपास दोन – चार अधिकारी आणि कर्मचारी स्वतःची ओळख लपवत बळजबरीने दुकानांत शिरले. यावेळी दुकान मालक हिम्मतलाल भाटी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वतःची ओळख सांगण्यासाठी आय कार्ड दाखविण्याची विनंती केली. यावेळी संतापलेल्या महापालिकेच्या निलेश गणपत कांबळे ह्या कर्मचाऱ्याने थेट हिम्मतलाल भाटी यांच्या गल्ल्याकडे बळजबरीने शिरूर गल्ल्यात हात टाकण्याचा प्रयत्न केला. असा आरोप लक्ष्मी स्वीट शॉपचे मालक हिम्मतलाल भाटी यांनी केला आहे.
यावेळी दुकान मालक हिम्मतलाल भाटी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्याला विरोध केला असता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हिम्मतलाल भाटी याला जातिवाचक शिवीगाळ करून चेहऱ्यावर हाताने फटका मारुन मारहाण करण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीला प्रतिकार करण्यासाठी दुकान मालक हिम्मतलाल भाटी यांनी देखील महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर रागा रागात हात उगारला. या मारामारीची दृश्य पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत.
या प्रकरणात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीस स्टेशन लक्ष्मी स्वीट दुकानाचे मालक हिम्मतलाल बाटी, त्यांचा मुलगा रामा भाटी आणि त्याच्या अनोळखी मित्रा विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र लक्ष्मी स्वीट मार्ट चे मालक हिम्मतलाल भाटी यांची तक्रार अजून पर्यंत वाकड पोलिसांनी घेतली नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक बंदी विरोधात कायदेशीर कारवाई करावी….. आम्ही त्यांच स्वागत करु….. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्याना मारहाण करून कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला ? असा सवाल लक्ष्मी स्वीट दुकानांचे मालक हिम्मत लाल बाटी यांनी केला आहे.
स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या दुकानावर कारवाई करायला हवी होती. मात्र त्यांनी तस नकरता गुंडागिरी करत आमच्या दुकानावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महापालिकेतच्या अशा गुंडागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं….. अशी मागणी लक्ष्मी स्वीट दुकानाचे मालक हिम्मतलाल भाटी आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाने केली आहे.