माथेरान : मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी जेष्ठ पत्रकार संतोष पवार (वय ५०) यांचे उपचार दरम्यान निधन झाले. त्याच्या निधनामूळे मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य आणि पदाधिकारी यांच्या साठी मोठा धक्का मानला जातो. संतोष पवार यांच्या मागे एक मुलगी, पत्नी, आई, वडील, असा परिवार आहे
“पवार माथेरानमधे दै सकाळ चे पत्रकार म्हणून काम करत होते. यापूर्वी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे सचिव म्हणून दहा वर्ष काम केले तर माथेरान नगरपालिकेचे नगरसेवक असताना विकासाची गंगा उभी केली. राजकिय पटलावर काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सूनिल तटकरे यांचे मोठे सहकार्य मिळाले. न्यूज २४ या चॅनलचेहि ते संपादक होते. पाच लाख सदस्य आणि १२ कोटी वाचक वर्ग तयार करून त्यांनी मोठे यश मिळवले होते. असा अभ्यासू प्रेमळ, व प्रामाणिक पणे काम करणारा पदाधिकारी गेल्याने परिषदेच्या सदस्यांसाठी धक्का देणारी घटना आहे.”
रायगड परिसरातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून उत्तम दर्जेदार पिक व भरपूर उत्पन्न कसे मिळवायचे याविषयी काम करून शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती व आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सत्कार करायचा हा प्रयोग रायगड जिल्ह्यातील पाच गावात शेतकऱ्यांसाठी राबवणारी पहिली व्यक्ती म्हणजे संतोष पवार यांचे नाव घेतले जाते. यामूळे लोकांचे प्रेम मिळाले सतत हास्य स्मित व दिलखुलास बोलणारे चालते बोलते व्यासपीठाने आज जगाचा निरोप घेतला. त्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.