थेरगाव | झुंज न्यूज : थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात चिंचवड येथील एक तरूण बुडाला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी दुपारी घडली. एक तरुण बंधाऱ्यावर मोबाईल मध्ये सेल्फी घेत असताना त्याचा तोल गेल्याने पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून गेला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच थेरगाव व वल्लभनगर येथील अग्निशमनची पथके देखील दाखल होत रात्री उशीरा पर्यंत बचाव कार्य सुरू होते. मात्र अंधार पडल्याने आणि पाऊस सुरू असल्याचे शोधकार्य थांबविण्यात आले आहे सकाळी पुन्हा पथके बुडालेल्या तरुणास शोधण्याचे कार्य सुरू करणार आहेत.