ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना सांगवी-पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पण
पिंपरी I झुंज न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपळे गुरव, नवी सांगवी यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित श्रद्धांजली सभेस महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजूअण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष साहेबराव तुपे, बापू वाघमारे, विलास थोरात, बबन काळे, अरुण भोसले, विठ्ठल थोरात, श्रीरंग गुजर, म्हसोबा रिक्षा स्टँड सभासद आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे रंगभूमीवरील एक हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी ‘मोरुची मावशी’ यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय ‘एक फुल चार हाफ’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘गोळा बेरीज’ अशा अनेक चित्रपटांमधून देखील भूमिका साकारल्या. त्यांच्या या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण केली.