(प्रतिनिधी : प्रसाद बोराटे )
आळंदी I झुंज न्यूज : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईबाई संस्थांनच्या वतीने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा या ही वर्षी संस्थांननी कायम ठेवली.
गेल्या अनेक वर्षांपासुन श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे तिघे संत भावंडांना नारळी पैार्णिमा, रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात येते. आज दि.११ ऑगस्ट रोजी पहाटे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक श्री मुक्ताई देवस्थान चे विश्वस्त संदीप रविंद्र पाटील, अंकीता संदीप पाटील यांनी केला व माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण केली
श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून मिळाली. यावेळी पुजारी योगेश चौधरी, विशाल महाराज खोले, दिपक महाराज, सागर महाराज,गणेश महाराज व आदी वारकरी उपस्थित होते.