मुंबई : तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला PUBG गेम बंद केल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यासर्वांना नाराज होण्याची गरज नाही. कारण, आता पबजी सारखाच भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता आणि खिलाडी अक्षय कुमारने दिली आहे. अक्षयने ट्विट करत या गेमची बद्दल लिहलं आहे. या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा २० % निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे.
“‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देत FAU-G हा गेम सादर करताना अभिमान वाटत आहे. करमणुकीव्यतिरिक्त, हा गेम खेळताना खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील. या गेममधून मिळाणाऱ्या पैशांपैकी २० % निधी जवानांना देण्यात येणार आहे’ असे अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटले आहे.”
केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणखी ११८ चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे, यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे.