नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी यांची ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना जन्म ११ डिसेंबर १९३५ ला पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील किरनाहरजवळील मिराती गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाम कामदा किंकर मुखर्जी आणि आईचं नाव राजलक्ष्मी मुखर्जी. सूरी विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते.
हिस्ट्री आणि पॉलिटिक्समध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लॉ ची पदवी प्राप्त केली. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर बांग्ला प्रकाशन संस्थेच्या देशेर डाकसाठी काही काळ पत्रकारिताही केली. बंगिय साहित्य परिषदेचे ट्रस्टी आणि अखिल भारत बंग साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे.