चिंचवड | झुंज न्यूज : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) चिंचवड-पिंपरी शाखेच्या वतीने टर्फ क्रिकेट व बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात क्रिकेट मध्ये शेरशा संघ व बॅडमिंटन मध्ये स्कुबिडुबी संघाने विजेतेपद मिळविले.
बॅडमिंटन सामन्यात स्कुबिडुबी संघ विजेता ठरला. या संघाला ११ हजराचे पारितोषिक व करंडक देण्यात आला. नॉडी संघ उपविजेता ठरला.लगोरी सामन्यात सिंगम व दबंग संघ अनुक्रमे विजेता व उपविजेता ठरला.
पाच दिवस चाललेल्या या सामन्यात सर्वच सामने चराशीचे झाले. तानिष भंसाळी व पायल चुत्तर यांना उत्कृष्ट फलंदाज, सम्यक लुणावत व ऋतुजा गुगले उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. प्रेक्षा लुंकड व मटीज जैन है उकृष्ठ खेळाडू ठरले. या सर्वना प्रत्येकी दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
या प्रसंगी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात जीतो चे शहराध्यक्ष संतोष धोका महाराष्ट्र झोन चे खजिनदार राजेंद्र जैन, महिला विभागाच्या अध्यक्षा तृप्ती कर्णावट, उद्योजक जितेंद्र सोनिगरा आदि मान्यवर उपस्थित होते. पूनम बंब,संकेत जैन, राहुल चोरडिया यांच्या सह जितोच्या इतर सभासदांनी सामान्याच्या आयोजनात सहकार्य केले.जैन बांधवांसाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, क्रिडा व सेवा या माध्यमातून कार्य सुरू आहे. पुरुष, महिला व नवयुवकांसाठी विविध योजना व व्यावसायिक दृष्टिकोन ठरवून कार्य केले जात आहे. या साठी जास्तीत जास्त बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन धोका यांनी केले.