हिंजवडी I झुंज न्यूज : आयटीनगरीतील संकल्प फॉर ग्रीन या टीम कडून हिंजवडी येथील टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. झाडांना पाणी मिळत राहावे यासाठी पाणी भरलेले मडके सोबत ठेवली आहेत.
संकल्प टीमचे संदीप पाल यांनी सांगितले की, पुण्यातील तापमान गतवर्षीपेक्षा यंदा जास्त आहे कारण डोंगर आणि जंगलांचा नाश होतोय दिवसोंदिवस शहरीकरणामुळे डोंगर व जंगलांचा होणार नाश टाळायचा आहे. त्यात आपण सर्वांनी पुढे येऊन जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. पर्यावरण स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान २ तरी झाडे लावली पाहिजेत.
या उपक्रमात दत्ता तांबे, बंडू लागडे, संदीप पाल, मनोज विघानिया, ऋषी तांबे, मनोज कुलकर्णी यांसह अनेक सदस्य सहभागी झाले होते.