पिंपरी I झुंज न्यूज : महाराष्ट्राचे बहुरूपी नेते राज ठाकरे हे संघाच्या पूर्णपणे बाहुपाशात गेलेले नेते आहेत, हे भाषणावरून समजते. 370 कलम, काश्मीर पंडितांवरील अन्याय, समान नागरी कायदा, मशिदीवरील भोंगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुद्दे आहेत. जे राज ठाकरे भाषणातून मांडताहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून येते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंवर केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांवर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे प्रत्युत्तर देत राज ठाकरे हे संघाच्या बाहुपाशात गेलेले नेते असल्याने संघाचे मुद्दे मांडत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली अनेक दशके शरद पवार साहेबांच्या विरोधात प्रचार करताना ‘शरद पवार साहेब हे जातीयवादी नेते, देव धर्म मानत नाहीत, एका धर्माचे लांगुलचालन करीत आहेत, हे मुद्दे मांडत आले आहे. आज फक्त राज ठाकरे सभेच्या माध्यमातून हे मुद्दे मांडत आहेत, हे स्पष्ट झाले.
राज ठाकरे हे आजोबा होऊनही पोरकटपणा करीत असलेल्या राज ठाकरेंनी आजपर्यंत जेवढ्या सभा घेतल्या नाहीत त्यापेक्षा कैकपटींनी जास्त मंदीरांना सभामंडप देण्याचे व तीर्थस्थळांचा विकास करण्याचे काम शरद पवार साहेब यांनी केले आहे. फरक एवढाच की श्रद्धेचा बाजार भरवून धर्माच्या नावाने पवार साहेब मतांचा जोगवा मागत नाहीत.