पिंपरी : गेल्या पंधरा दिवसांत मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण ८९.२९ टक्के भरले आहे . पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारा रावेत बंधाराही ओसंडून वाहू लागला आह. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे.
रावेत बंधाराही ओसंडून वाहू लागला आहे
मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्याही पाण्याची पातळी वाढत आहे . गेल्या २४ तासांत ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी आजपर्यंत सुमारे ३,१४९ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात ११ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ८९.३९ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा १०० टक्के झाला होता . यासह नाणे मावळातील वडीवळे धरण हे ८४.४० टक्के भरले आहे. धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आलाआहे.
या धरणामुळे नाणे मावळातील आणि इंद्रायणी नदीकाठच्या गावाचा पाणी प्रश्न मिटला आहे. नद्या, ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.