पुणे I झुंज न्यूज : ‘प्रियदर्शन सौंदर्या फिल्म्स’ प्रस्तुत आणि प्रियदर्शन जपे “प्रियदर्शन सौंदर्या” लिखित आणि दिग्दर्शित “बंदकोष ” या लघु चित्रपटाचा प्रथम शो दि 27 मार्च 2022 रोजी ‘4K स्टुडिओ” पुणे येथे प्रदर्शित झाला..
चित्रपटाची कथा ही वेगळी असून ती एका अतिशय संवेदनशील व्यक्तीरेखेच्या भावनांना स्पर्श करते…. भौतिक रूपापेक्षा मानसिक स्वरूप हे वेगळे आणि तरल असल्यामुळे ट्रान्स-पर्सन असलेल्या कथेच्या नायिकेची दोलायमान व हळुवार अवस्था दाखविण्यात आली आहे. समाजाच्या नकारात्मक प्रतिक्रियेचे भय तिला आयुष्यभर बंदिस्त करते. त्यातून बाहेर येऊन एका सुंदर फुलपाखरात उमलण्यात ती यशस्वी होते का, हा या कथेचा गाभा आहे.
लघु चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निर्माते व प्रमुख भूमिका प्रियदर्शन जपे ‘प्रियदर्शन सौंदर्या ‘ यांनी केले आहे. सहदिग्दर्शक व पटकथा हेमंत पांडुळे, भूमिका मीरा पासवान, हेमंत प्रभाकर, योगेश व सहाय्यक भूमिकेत गिरीश भोईटे, समीर इनामदार, हमीदा शेख व इतर आहेत. या चित्रपटातून बाल कलाकार तन्मयी जपे हिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे.
छायाचित्रण अभिजित विजया भास्कर , संगीत ऋत्विक सुतार, संकलन ऋषी शिंदे, प्रतीक सरजोशी, डिजिटल इंटरमिजिएट प्रतीक सरजोशी, पोस्ट प्रोडक्शन हेड व क्रिएटीव्ह एडिटर शुभम सुद्रिक, मेकअप व हेअर स्मिता अंजुते व हितेश पवार, आर्ट डायरेकशन संदीप मरगोज ‘ सँडी ‘, विशेष मार्गदर्शन समीर वंजारी.
चित्रपट प्रदर्शनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रान्स-पर्सन कम्युनिटी, त्यांचे स्ट्रगल, होणारी उपेक्षा व रोजगारांच्या संधीचा अभाव ह्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ट्रान्स-पर्सन राणी पटेल व सहकारी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. फिल्म बंदकोष आणि टीम तर्फे ट्रान्स-पर्सन्सना समाजात बरोबरीचे व सन्माननीय स्थान व रोजगाराच्या संधी मिळाव्यात असे समाज व उद्योजकांना आवाहन करण्यात आले.