थेरगाव I झुंज न्यूज : श्री तुलसी मानस मंडल थेरगाव चिंचवड द्वारा आयोजित अखंड रामायण पाठ भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. गेल्या पंचवीस वर्षापासून सुरु असलेले अखंड रामायण पाठ या यावर्षीही श्री लक्ष्मीनारायण मंदिर, पदमजी पेपर मिल येथे आयोजित करण्यात आले होते.
यावर्षी म्हणजेच 2022 साली मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, राजनीतिक, प्रशासकीय, व अन्य समाजिक लोकांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास श्रीरंग बारणे (खासदार- मावळ लोकसभा), लक्ष्मण जगताप (आमदार- चिंचवड विधानसभा), डॉ. विवेक मुगलीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन) यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंडळाचे आधारस्तंभ लालजी दिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष- सभाजीत मिश्रा, व्यवस्थापक- अविनेश दिवेदी, कोषाअध्यक्ष- राजेश दिवेदी, उपाध्यक्ष- जगदीश मिश्रा, कार्याध्यक्ष- अजय पांडे, अभिषेक दुबे, सुभाष पांडे, फुलचंद मिश्रा, विनोद (गुड्डू) चौबे, रमेश पांडे, शैलेश पांडे, विद्यानंद उपाध्याय, कपिल सरोज, वीरेंद्र दुबे, त्रिभुवन नाथ पांडे, राजेश दुबे, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम केले.
लालजी दिवेदी यांनी मंडळाचे कामकाजबद्दल लोकांना सांगितले, तर डॉ. विवेक मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलिस स्टेशन) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावी व आपला परिसर स्वच्छ कसे ठेवावे याबद्दल माहिती दिली, तसेच सभाजीत मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.