पिंपरी I झुंज न्यूज : हिंदुह्रद्यसम्राठ वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त (भव्य रक्तदान शिबिर तसेच गरजू महिलांना धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन शगुन चौक पिंपरी कँम्प येथे मातोश्री सामाजिक संस्थेची संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी हिंदुह्रद्यसम्राठ शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची पुजन पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैभव थोरात, महिला संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, मा आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, वैशाली मराठे, सरिता साने, वैशाली कुलथे, शैला पाचपुते, शिल्पा आनपण, भाग्यश्री म्हस्के, अल्पसंख्याक शहरप्रमुख हाजी दस्तगिर मनियार, चिंचवड विधानसभाप्रमूख आनंत कोर्हाळे, उपशहरप्रमुख हरिष नखाते, गुलाबराव गरुड, उपशहरप्रमुख पांडुरंग पाटील, समन्वयक माधव मुळे, भाविक देशमुख, संतोष सौंदनकर, खंडु शिरसाठ, दिपक कांबळे, अनिल पारचा, माऊली जगताप, अनिल पालांडे, हनुमंत पिसाळ,शहरातील सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी गणेश आहेर यांच्या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच मा. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आपल्या मनोगता मध्ये गणेश आहेर यांची कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन गणेश पाडुळे, गोरख पाटील, नवनाथ जाधव, प्रदिप दळवी, गणेश वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, रविकिरण घटकार, अंकुश कोळकर, जितेंद्र जुनेजा, नारायण खुशलाणी, मारुती म्हस्के, दत्ता गिरी, भरत इंगळे, गणेश वाळुंज, दिपक भक्त, अक्षय घटकार, अमित आहेर, शंकर शिंगारे आणि करण आहेर यांनी केले होते.