शिरुर: येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील झाडे तोडल्याप्रकरणी वृक्षतोड करणाऱ्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे संस्थाचालक आणि प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी प्रमुख मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिरुर नगर पालिकेसमोर गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आल. वृक्षारोपण तसेच वृक्ष वाटप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं.
“या आंदोलनाची दखल घेत शिरुर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी १४ तारखेला संबंधितांची समोर सुनावणी घेऊन, ऑगस्ट अखेर कारवाई करणार असल्याचे आंदोलकांना लेखी आश्वासन दिले.”
या लेखी आश्वासनानंतर मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे, वृक्षप्रेमी परेश सुपते यांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष संदिप कडेकर, महिला आघाडीच्या डॉ.वैशालि साखरे, शारदा भुजबळ, प्रितेश फुलढाळे, लहुजी शक्ती सेनेचे विशाल जोगदंड, भाजपा चे विजय नरके, कदम काका, प्रशांत गायकवाड तसेच अनेक वृक्षप्रेमींनी या आंदोलनास पाठिंबा दिला.