शिरूर I झुंज न्यूज : उरळगाव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या गुणवंता सह मिस इंटरनॅशनल क्वीन, कोरणा योद्धा म्हणून पत्रकार, आरोग्य खात्यातील कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, माजी सैनिक, पोलीस दलातील महिला, सेवानिवृत्त कृषी व पशुसंवर्धन अधिकारी आदींना सन्मानित करण्यात आले.
ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे मानाचा मिस इंटरनॅशनल क्वीन नीता सुनील सात्रस, शिरूर भूषण रमेश बांडे, राज्य क्रिकेट संघात निवड झालेला हनुमंत कुदळे, निवृत्त वायू दलातील अधिकारी छगनराव बांडे , जमालभाई शेख माजी सैनिक भानुदास शिंदे संतोष आफळे संतोष जांभळकर, पंढरीनाथ बांडे अंकुश सात्रस, निवृत्त सीआरपी अधिकारी आत्माराम वेताळ, निवृत्त कृषी अधिकारी कैलास सात्रस, कैलास चव्हाण, साहेबराव गिरमकर, निवृत्त बँक मॅनेजर कुंडलिक कोकडे, निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी रामदास पंदरकर आरोग्य कर्मचारी जना शिरसाट, अंगणवाडी कर्मचारी कौशल्या गिरमकर , निवृत्त शिक्षक दशरथ आफळे मुकिंदा वेताळ रघुनाथ बेनके, सिताराम बिडगर, शंकराव बर्वे, चंद्रकांत आफळे, कोरोना काळामध्ये काम केलेले आशा वर्कर मनीषा जांभळकर रोहिणी चव्हाण वर्षा जाधव नंदा कुदळे, पोलीस अधिकारी, आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी आदर्श माजी सरपंच सुनील सात्रस, सरपंच सारिका गजानन जांभळकर, उपसरपंच स्वाती शशिकांत कोकडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक चव्हाण , रफिक शेख, स्वप्नील गिरमकर, शकुंतला काळे, लंका पाचुंदकर , निकिता सात्रस, भाग्यश्री होलगुंडे , प्रभाकर अण्णा जांभळकर, सागर कोळपे संजय जांभळकर, भरत आफळे, दत्ता सात्रस, विजय शेठ मुथा, संतोष मुथा, अभय मुथा, अभय तातेड, रवी तातेड, बाबू आफळे, युवराज वायदंडे, श्रावण बांडे, किरण माने, अभिषेक कुदळे, शिवाजी सात्रस गोरख सात्रस, मिलिंद ढमढेरे, पप्पू वायदंडे, मयूर चव्हाण, अनुराग कोकडे, ऋषिकेश कोकडे, कल्याणी कोकडे, प्रतीक्षा चव्हाण, ऋतुजा वडघुले, हर्षदा मुथा, प्रियंका गिरमकर, खुशी जसाभाटी, आकांशा ओस्तवाल, प्रतीक्षा नरे, सई कोकडे, प्रांजल कोकडे, आरती सात्रस, ऋतुजा चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकडे यांनी केले.
“कोरोनाच्या संकटामुळे समाज गोंधळून गेलेला असताना पत्रकारांनी योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. डॉक्टर, परिचारिका व पोलिसांच्या बरोबरीने काम करणारे पत्रकार हे देखील कोरोना योध्देच आहे. (- शशिकांत कोकडे, सामाजिक कार्यकर्ते उरळगाव )