गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म” म्हणून पुरस्कार
पिंपरी I झुंज न्यूज : वर्किंग वूमन’ या विषयावर आधारित असलेला बहुचर्चित ‘भावना’ हा लघुपट (शॉर्टफिल्म) ९ जानेवारी आज “रेडबड मोशन पिक्चर्स” या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झाला आहे. या लघुपटाला गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये “बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म” हा पुरस्कार मिळाला आहे. रेडबड मोशन पिक्चरने हा लघुपट बनवला आहे. याचे लेखन, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले सीए अरविंद भोसले यांनी केले आहे. तर पोस्ट प्रोडक्शन (संपादन) पिंपरी चिंचडमधील एपीएच स्टुडिओच्या डायरेक्टर व अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे.
या शॉर्ट फिल्मच्या केंद्रस्थानी काम करणा-या महिला आहेत. त्यांना रोजच्या दैनंदिन जीवनात येणा-या अडचणी या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न भोसले यांनी केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत महिला काम करतात. किचन, ऑफिस, मुलांचे संगोपन, घरातील जबाबदा-या या प्रत्येक बाबतीत महिलांची भूमिका महत्वाची आहे.
महिला त्यांना येणा-या अडचणी, त्यांना होणारा त्रास सहसा कुणाला सांगत नाहीत. पण त्यांच्या भावनांना जाणून घेणं समाज, कुटुंब म्हणून आपली जबाबदारी आहे. प्रत्येक कुटुंबाने कुटुंबातील स्त्रीची भूमिका, तिची मनस्थिती आणि तिच्या “भावना” जाणून घेणं गरजेचं आहे. तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. महिला सशक्तीकरणाचा एक चांगला सामाजिक संदेश या शॉर्टफिल्म मधून देण्यात आला आहे.
या लघुपटाची निर्मिती युवराज तावरे, मनोज गायकवाड, विलास जेऊरकर, अजय पुजारी यांनी केली आहे. सहनिर्माते सतीश लिंगाडे आहेत. मुख्य कलाकार म्हणून पिया कोसुंबकर यांनी काम केले आहे. तर सह कलाकार म्हणून पूजा वाघ, प्रसाद खैरे, रोहित पवार, धनंजय नारखेडे, चिराग चौधरी, सेजल गायकवाड, बालकलाकार अर्णव चावक यांनी काम केले आहे.
“सीए अरविंद भोसले म्हणाले की, “भावना” हा माझा चौथा लघुपट आहे. यावपूर्वी एडिक्शन वर्सेस अटॅचमेंट, बायकॉट ट्रेस, आय ओपनर, हे सामजिक संदेश देणारे लघुपट बनविले आहेत. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. परंतु, कौटुंबिक व सार्वजनिक जीवनात तिची होणारी घालमेल समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. उलट तिच्यावर बंधणे लादली जातात. तु हेच करायचं, तू तेच करायचं, हे करायचं नाही, अशी बांधणे लादल्यामुळे स्त्री कुटुंबापुरती मर्यादीत राहिली आहे. कुटुंबामध्ये सुध्दा तिच्या भावना देखील ओळखल्या पाहिजे. अशा वेळी तिची होणारी अवस्था ‘भावना’ या शॉर्ट फिल्ममधून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.