पिंपरी | झुंज न्यूज : मागली दोन आठवडयापूर्वी सांगवी परिसरात घडलेल्या योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस व आरोपींमध्ये चकमक घडली असून यात आरोपींनी केले तीन राउंड फायर केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आरोपींसोबत झालेल्या झटापटीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाल्याची चर्चा आहे.
अशी केली कारवाई
या गुन्हया प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी चाकण मधील कुरवंडी गावात हे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आयुक्तालयातील चार पथकांनी तात्काळ हालचाली करत त्यांना पकडण्याची कारवाई केली.
पोलीस पकडण्यासाठी गेले, असता मुख्य आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण आणि त्याचा साथीदारांनी पोलिसांवर केली फायरिंग सुरु केली. मात्र पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्यात यश आले . यावेळी पोलिसांनी 4 पिस्तुल तीन जिवंत काडतुस आणि गुन्हात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी केली जप्त केले आहे.
वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हत्या
सांगवीतील काटेपुराम चौकात सकाळी साडेदहा व्यवसायिक योगेश जगताप यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायिक योगेश यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा गोळ्यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या यात जगताप गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी यांनी जगताप यांच्यावर जुन्या भांडणाचा राग उकरून काढत हल्ला केला. यामध्ये पोलिसांनी गणेश मोटे व अश्विन चव्हाण या दोघांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सांगवीतील त्या परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने संगनमत करुन हल्ल्याचा कट रचला.
घटनेच्या दरम्यान योगेश दत्त जयंती निमित्त सुरु होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पाहत असताना गणेश मोटे व अश्विन चव्हाण तेथे आले. त्यांनी ‘ योग्या तुला आता जिवंत ठेवत नाही म्हणत पिस्तूल घेऊन त्यांच्यामागे धावले, त्यांच्या हातात पिस्तूल बघून योगेश यांनी पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तब्बल सहागोळया झाडल्या. त्यातील दोन गोळ्या लागून योगश गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी आणखी एकाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेतली व तेथून पळ काढला.