पुणे I झुंज न्यूज : मानवतावादी समाजसेवा संस्था, पुणे या संस्थेच्या 28 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवजीवन बालनिकेतन बहुउद्देशीय संस्था, उरुळी देवाची, ता. हवेली येथील अनाथ मुलांच्या आश्रमातील मुलांना गणवेष वाटप, मुलींना सौंदर्य प्रसादनाच्या वस्तू वाटप करण्यात आल्या. त्याच बरोबर संस्थेला देणगी स्वरूपात मदत करण्यात आली.
संस्थेचे कार्यकारी सदस्य पदमाकर बांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अनाथालयाचे अध्यक्ष अमर भोसले यांनी संस्थेची माहिती दिली. तसेच संस्थेच्या सल्लागार माधुरी घाटपांडे यांनी बालगीत सदर केले. अनाथालयातील छोट्या बालकांनी उत्तमप्रकारे समूह गीत गायले. तसेच मानवतावादी संघटनेचे सचिव अशोक जाधव यांनी बालकांना गोष्टी सांगून मुलांचे मनोरंजन केले.
यावेळी संघटनेचे सचिव अशोक जाधव, उपाध्यक्ष प्रकाश रावळकर,खजिनदार मोहमद सईद, कार्यकारी सदस्य पदमाकर बांडे, मेहमूदशा भंडारी, सल्लागार माधुरी घाटपांडे, रजनी दाणी, सदस्य दत्तात्रय भोसले, दीपक गायकवाड, नामदेव जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश रावळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.