चाकण : महाराष्ट्रमध्ये राज्यपाल नियुक्त बारा आमदार विधान परिषदेवर नियुक्त करणे असून, यासाठी कला, क्रीडा, सामाजिक सह विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपाल आमदार पदी नियुक्त करण्याची कायद्यात नमूद असून , याबाबत असंघटित कामगार रिक्षाचालकांचे प्रतिनिधी म्हणून कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे अशी मागणी महाराष्ट्र भरातून करण्यात येत आहे.
यामध्ये रिक्षा चालक मालक या मागणी मध्ये आघाडीवर असून सर्व रिक्षा चालक मालकांनी रिक्षाचालकांचे प्रतिनिधी म्हणून बाबा कांबळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी श्री चक्रेश्वर रिक्षा संघटना चाकण तर्फे श्रावणी सोमवार निमित्त श्री संगमेश्वर मंदीर संगमवाडी येथे संगमेश्वर महादेवास दुग्धाभिषेक करुन श्री संगमेश्वर महादेवाची पुजा करण्यात आली.
चाकण येथील रिक्षा चालक मालकांनी अनोखा उपक्रम आयोजित करून बाबा कांबळे राज्यपाल नियुक्त आमदार व्हावेत यासाठी साकडे घातले. यावेळी बाबा कांबळे यांच्या बरोबर पुजेचे मानकरी म्हणुन संघटनेचे जेष्ट सदस्य दत्तत्रय गायकवाड व संघटनेचे अध्यक्ष कैलास नाना वलांडे, बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे ,अजय लोंढे, सुनील कदम हे सहभागी होते.
या वेळी नितीन कुटे, शरद वाघुले, दत्ता कुटे, गणेश शिंदे, रामदास लोणारी, दत्तात्रय लोणारी, नवनाथ पोतले, हामीद भाई तांबोळी, सतीष मुंगसे, भगवान खांडेभराड, रंगनाथ थोरात, बंडु भुजबळ , राहुल मुंगसे, आशोक दौंडकर, शांताराम मुंगसे, किरन मुंगसे, संतोष मस्के, रमेश शिंदे, भानदास गांडेकर, लक्ष्मण गांडेकर, बाळासाहेब बागडे, सचिन कांबळे, दत्ता लांडे, रोहीदास मुंगसे, दिपक कुसाळकर, मंगेश डोंगरे, हसन तांबोळी, गजानंन लोणारू, दौंडकर बुवा, सचिन मुंगसे, संपत लोणारी, माऊली शिंदे, हे संघटनेचे रिक्षाचालक-मालक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन चक्रेश्वर रिक्षा संघटनेचे , कैलास नाना वलांडे, पोपट खांडेभराड,राजुभाऊ शिंदे,बाळासाहेब ढवळे यांनी केले होते.