मुळशी I झुंज न्यूज : कै. आप्पासाहेब ढमाले माध्यमिक विद्यालय खेचरे, तालुका मुळशी जिल्हा पुणे संस्थेच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन १९९८ च्या बॅच वितीने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा गतवर्षी घेण्यात आला नाही परंतु यंदा कोरोनाच्या कमी प्रादुर्भावामुळे ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न संपन्न झाला.
या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार श्री बजरंग प्रक्षाळे यांना देण्यात आला आहे. प्रक्षाळे हे कै आप्पासाहेब ढमाले माध्यमिक विद्यालय खेचरे या संस्थेत मराठी विषयांचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. पण याचं संस्थेच्या म्हणजे सेनापती बापट माध्यमिक विद्यालय माले या संस्थेत प्रक्षाळे हे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत परंतु प्रक्षाळे हे सन १९९८ च्या बॅच चे शिक्षक असल्याने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी कै आप्पासाहेब ढमाले, माध्यमिक विद्यालय खेचरे शाळेतील मुख्याध्यापक अंकुश बोऱ्हाडे सर, शिक्षक अशोक सुंबे सर, निवृत्ती भोसले सर यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल चे डायरेक्टर राजेंद्र बांदल साहेब, शिवसेना जिल्हा संघटक सचिन दगडे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा सोसायटी चेअरमन शिवाजी वीर, सॉफ्टवेअर इंजिनियर हरिष मातेरे, मांदेडे ग्रामपंचायत सदस्य दिपक वीर व आप्पासाहेब ढमाले माध्यमिक विद्यालय खेचरे शाळेतील माजी विद्यार्थी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू कंधारे, उद्योजक संदिप पारखी, इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टर दुर्वेश धुमाळ,कोंढावळे ग्रामपंचायत उपसरपंच अशोक जोरी, कॉन्ट्रॅक्टर सखाराम पवार, संतोष धुमाळ , कबड्डी खेळाडू आरती धुमाळ, श्री बालाजी प्रतिष्ठाण कबड्डी संघाचे कबड्डी खेळाडू प्रसन्न कंधारे, सानिया कंधारे,खुशी देशमुख,नपुर देशमुख, अश्विनी टुकूरुड, वाघ सर, जाधव सर यांनी आपली उपस्थिती दाखवली.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रक्षाळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर इतर शिक्षकांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजेंद्र बांदल यांनी सांगितले की, शिक्षक हा सर्व श्रेष्ठ आहे शिक्षकांची तुलना कोणाशी करू शकत नाही. माजी विद्यार्थी शिक्षक यांना सन्मानित करत आहे. यापेक्षा अजून मोठे सुख असू शकत नाही.
तसेच वाघ सर, जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिवाजी वीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .तर बोऱ्हाडे सर यांनी सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले तर प्रक्षाळे सर यांनी आपल्या केलेल्या सत्कार अर्थ आपल्या विचारांचा पुन्हा एकदा उजाळा देऊन सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांचे कौतुक केले अशोक जोरी यांनी प्रास्ताविक केले तर पप्पू कंधारे यांनी आभार मानले.