- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: झुंज न्यूज
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com
भाजप नगरसेवक पहिलवान अंबरनाथ कांबळे यांची पक्षाला सोडचिठ्ठी ; शरद पवार गटात प्रवेश चिंचवड । झुंज न्यूज : चिंचवडमध्ये आजचा राजकीय दिवस गाजला तो जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रोड शोने. चिंचवडमध्ये रोड शोची सांगता करतांना शरद पवारांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी नवी सांगवी भागातील भाजपचे नगरसेवक पहिलवान अंबरनाथ कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कांबळे यांच्यासह संतोष जाधव, सचिन कुळपकर, प्रविण देवासी, हनुमंत मारकड, दीपक पोटे, मयूर जाधव या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच वंचितचे सुमित भोसले यांनी तुतारी हाती घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.…
जागोजागी पुष्पवृष्टी, नागरिकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी वाकड । झुंज न्यूज : चिंचवड विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी गुरुवारी (ता. १४) तब्बल तीन तास ‘रोड शो’ केला. सांगवीतून सुरु होऊन वाल्हेकर वाडी इथे समाप्त झालेल्या या रोड शोला चिंचवड वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २० वर्षानंतर आणि चिंचवडच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवारांनी रोड शो केला. त्यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची राजकीय मुसंडी हा दिवसभर चर्चेचा विषय राहिला. रोड-शोचे चौका-चौकात जल्लोषात स्वागत झाले. यात्रे दरम्यान शरद पवार आणि उमेदवार राहुल कलाटे सर्वांना हात उंचावून…
राहुल ‘टेंडर’मध्ये नव्हे तर; लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणारा कार्यकर्ता पिंपरी । झुंज न्यूज : ‘टेंडर’ मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुलकडून केले जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे त्याला एकदा संधी द्या, अशी भावनीक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १४) वाल्हेकरवाडी येथील सभेत चिंचवडच्या मतदारांना घातली. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी उमेदवार राहुल कलाटे, माजी खासदार विदुरा…
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा महायुतीवर घणाघाती हल्ला डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचा विजय निश्चित, पण गाफील राहू नका – कोल्हे पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड मधील तीनही आमदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये आता पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले व महायुतीवर त्यांनी घणाघाती हल्ले चढवले. पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. या संवाद मेळाव्यास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते आमदार सचिन…
अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा आरपीआयचा निर्धार पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अत्यंत सक्रिय व काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी व नेत्यांनी केला आहे. त्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, अशा सूचना आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्या. आकुर्डी येथे आयोजित मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआय महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आरपीआयचे महाराष्ट्र संघटन सचिव परशुराम वाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी नगरसेवक सुजाता पालांडे,…
– सातारा, सांगली, कोल्हापूरकर मैदानात ; विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका भोसरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांचे मतदान हे दरवेळी निर्णायक भूमिका बजावत असते. गेली दोन टर्म आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरवासी आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी यंदाही ठामपणे उभे आहेत. आमचे निर्णायक मतदान आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या पारड्यात टाकून त्यांची हॅट्रिक निश्चित करणार आहे. कारण, २०१९ मध्ये उद्भवलेली महापूर परिस्थिती आणि महेश लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम आम्ही विसरलो नाही, असा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.…
महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या समर्थनार्थ रहाटणीतील ग्रामस्थांची ‘वज्रमुठ’! रहाटणीतील ‘लाडक्या बहिणीं’कडून शंकर जगताप यांचे जोरदार स्वागत चिंचवड I झुंज न्यूज : स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून रहाटणी गावचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या आमदार निधीतून रहाटणी गावाचा जो अविश्वसनीय विकास झाला आहे, त्यामुळे आम्हाला रहाटणीकर म्हणवून घेताना अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या याच विकासकामांची पावती म्हणून आम्ही सर्व रहाटणीतील नागरिक एकजुटीने आणि एकमताने शंकर जगताप यांना मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवणार; असा संकल्प रहाटणी ग्रामस्थांनी केला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा रहाटणी गावात झंजावाती…
खेड I झुंज न्यूज : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांना रिपब्लिक जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली भोसले यांच्या हस्ते पक्षाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक,विचारवंत अर्जुनजी डांगळे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार आळंदी येथे सचिन अहिर यांच्या समवेत पाठिंबा दर्शविण्यात आला. गेले बारा वर्षे रिपब्लिकन जनशक्ती पक्षाची शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे यांच्याबरोबर युती असून युतीचा धर्म म्हणून महाविकास आघाडीला रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा जिल्ह्याच्या सर्व ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. यावेळी पक्षाचे खेड तालुका सचिव शंभु कांबळे, खेड तालुक्याचे कार्याध्यक्ष रमेश बवले, महिला उपाध्यक्ष तिफन्ना काळे, महिला अध्यक्ष रुक्मिणी कांबळे, काजल शिंदे, किरण काळे, ज्ञानबा वाघमारे, युवक…
– माजी नगरसेवक उतरले मैदानात ; इंद्रायणीनगरची शांतता, सलोखा महत्वाचा – सीमा सावळे, संजय वाबळे, रवी लांडगे, विक्रांत लांडे यांनी प्रचारात आणली रंगत भोसरी I झुंज न्यूज : इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरातील शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे असे म्हणत परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरते. इंद्रायणीनगर , बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची असे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात चांगलीच रंगत आणली. दरम्यान भोसरी येथे बुधवारी झालेल्या शरद पवार यांच्या सभेमुळे वातावरण फिरले असल्याची प्रचिती या प्रचार दौऱ्यातील गर्दीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस…
पिंपळे सौदागर । झुंज न्यूज : चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळच्या सत्रात पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्याशी मनमोकळेपणे सुसंवाद साधत नागरिकांच्या समस्या तसेच अडीअडचणी समजून घेतल्या. पिंपळे सौदागर वासियांना रोज भेडसावणारे प्रश्न त्याच बरोबर त्यांच्या मनातील भावना समजून घेवून त्यांच्याशी भोईर यांनी समाधानकारक चर्चा करून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा पिंपळे सौदागर येथील नागरिकांना शाब्दिक आधार दिला. पिंपळे सौदागर येथील नागरिक म्हणाले की आम्ही पूर्ण ताकदीनिशी भाऊसाहेब भोईरांच्या पाठीशी असून आम्ही भोईर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी भाऊसाहेब भोईर म्हणाले की सर्वधर्म समभाव आणि निक्षपाती भावना मनात ठेवून…
पेरीविंकल स्कुल मध्ये बालदिन उत्साहात साजरा बावधन I झुंज न्यूज : सर्वच सण आणि उत्सव साजरा करण्याची पेरीविंकल मध्ये असेल्या दीर्घ परंपरेला साजेसा “बालदिनाचा” कार्यक्रम पेरीविंकलच्या पिरंगुट शाखेत विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. बालदिन हा केवळ खेळाच्या माध्यमातून साजरा न करता बालवयातील विद्यार्त्यांवर संस्कार होणे जास्त महत्वाचे. आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेऊन पेरीविंकल शाळा समूहाच्या पिरंगुट शाखेत सर्व विद्यार्थ्यांना बालदिन, भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्या जन्म दिनाची माहिती सांगून वातावरण निर्मिती केली गेली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्याना पंडित नेहरू यांच्यावरील माहितीपटही दाखविण्यात आला. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी त्यांची एकुलती एक लाडकी कन्या भारताच्या…
अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचे आवाहन भोसरी I झुंज न्यूज : भोसरी मतदार संघातील तमाम सोसायटी धारकांच्या समस्या आम्हाला माहित आहेत . प्रत्येक सोसायटीत काही ना काही समस्या आहेत . त्या समस्या आपण स्थानिक लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचवल्या असतील , पण ते आपल्या समस्या सोडवण्यात अपयशी आले , याची मला जाणीव आहे , म्हणूनच यावेळी तुम्हाला , तुमच्या समस्या सोडवणारा आमदार निवडावा लागणार आहे. यावेळी भोसरी विधानसभेत एक सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून अजित गव्हाणे यांच्या तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून त्याना प्रचंड मताधिक्य द्या असे आवाहन भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी चर्होली…
हास्य कलाकार भाऊ कदम यांचा बनसोडे यांच्या पदयात्रेत सहभाग अजित पवार मुख्यमंत्री होणारच ! ; भाऊ कदम यांचा विश्वास पिंपरी I झुंज न्यूज : राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी हास्य कलाकार, अभिनेते भाऊ कदम पिंपरीत आले. आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा बहुमतांनी विजयी होतील, अशी खात्री भाऊ कदम यांनी व्यक्त केली. महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी मंगळवारी (दि. 12) चिंचवड परिसरातील रामनगर, शंकर नगर, दत्तनगर, विद्यानगर, परशुराम नगर या भागात पदयात्रा काढली. पदयात्रेमध्ये चला हवा येऊ द्या फेम हास्य कलाकार भाऊ कदम यांनी सहभाग घेतला. रामनगर येथील राम…
पिंपरी I झुंज न्यूज : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचीही पार्थ पवार यांनी भेट घेतली. ज्येष्ठ नेते नंदू कदम, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पिल्ले, प्रदेश युवा मोर्चाचे अनुप मोरे,माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, जितेंद्र ननावरे, शितल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रभाकर वाघेरे, डब्बू आसवानी यांच्या जनसंपर्क कार्यालयांना व निवासस्थानी पार्थ पवार यांनी प्रत्यक्ष भेट दिली. व चर्चाही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष फजल शेख, चंद्रकांत गायकवाड, रवींद्र ओव्हाळ, रवी काची, अजित भालेराव, देवदत्त लांडे, पंकज दलाल, शाकीर भाई शेख,…
– विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांचे आवाहन – महाविकास आघाडीचे धोरण महिला विरोधी – चित्रा वाघ भोसरी I झुंज न्यूज : महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले आहे. नारीवंदन विधेयक, मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नारी ही वंदनीय आहे. हा विश्वास देणाऱ्या भाजप सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे याच तत्वावर काम करत असून स्त्री शक्तीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या , महिलांना सशक्त व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महेश लांडगे यांच्या हॅट्रिक साठी महिला शक्तीने पुढे…
पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुलक्षणा शिलवंत नक्की निवडून येणार ; सुळे यांचा विश्वास पिंपरी I झुंज न्यूज : बटेंगे तो कटेंगे असे म्हणत सामाजिक विषमता पसरविणाऱ्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो. असे म्हणत पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत नक्की निवडून येणार असा विश्वास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आकुर्डी येथील खंडोबा माळ मैदानात पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मतदारसंघातील हजारो महिला भगिनींनी तुफान गर्दी केली होती.…
पिंपरी । झुंज न्यूज : पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी आकुर्डी गावठाण व परिसरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष व माजी नगरसेविका वैशाली काळभोर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, भाजपा शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, ईश्वर ठोंबरे, निलेश पांढरकर, प्रमोद कुटे, कैलास कुटे,…
– ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ समाजासाठी घातक ; चऱ्होलीतील सभेत विजयाच्या हॅट्रिकसाठी महायुची वज्रमूठ भोसरी । झुंज न्यूज : लोकसभेमध्ये ‘व्होट जिहाद’ नावाची सुप्त चळवळ चालवली गेली. ज्यामध्ये क्रूरकर्मा अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवलेल्या सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीलाही पराभूत केले. म्हणूनच विधानसभेला सतर्क होऊन आपल्याला ‘व्होट हिंदुत्व’ पुढे न्यायचे आहे. पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय गोवंश जतन, हिंदू राष्ट्राभिमान आणि हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणाऱ्याला विजयी करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वाधिक मताधिक्य मिळालेला उमेदवार म्हणून महेश लांडगे यांचे नाव पुढे आले पाहिजे, असे आवाहन समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले. भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश…
राहुल कलाटेंसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एल्गार पिंपरी । झुंज न्यूज : यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्याची लढाई आहे. निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा देणारा असेल. सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक व महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा एल्गार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला. शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा संघटक संज्योग वाघेरे, पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमूख केशरीनाथ पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, युवासेना प्रमुख चेतन पवार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर संघटिका…
– विजयाच्या हॅट्रिकसाठी दहा हत्तींचे बळ तुमच्या पाठीशी उभे करू ! – ‘सुसंस्कृत’ नेत्यांना दादांनी आरसा दाखवला : माजी नगरसेवक विकास डोळस भोसरी । झुंज न्यूज : कसरतीने कमावलेली शरीरयष्टी, धिप्पाड देहबोली, रुबाब असा की नुसत्या नजरेने समोरचा गारद होईल. पण आज पुन्हा एकदा या भोसरीच्या पैलवान आमदार महेश लांडगे यांच्या हृदयातला हळवा कोपरा कार्यकर्त्यांनी अनुभवला. “माझ्या कार्यकर्त्याला, जपलेल्या माणसांना, धक्का जरी लागला तर माझ्यातला महेश लांडगे जागा होईल”असे दादा तुम्ही जेव्हा भरगच्च व्यासपीठावरून, हजारो नागरिकांच्या समोर निक्षून सांगितलं. तेव्हा कार्यकर्ते म्हणून आमचा उर भरुन आला. कार्यकर्त्यांची डोकी फुटली तरी राजकारणच करू पाहणाऱ्या ”सुसंस्कृत” लोकांना दादा तुम्ही आरसाच दाखवला, अशा…